Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच पत्रकारांवर रागावताना दिसतात. त्याचं कारणही तसंच आहे. कारण पत्रकार त्यांना चालू राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारतात.
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे नेहमीच पत्रकारांवर रागावताना दिसतात. त्याचं कारणही तसंच आहे. कारण पत्रकार (journalist) त्यांना चालू राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारतात. कोण काय म्हणालं? कुणी काय राजकीय प्रतिक्रिया दिलीय याबाबत त्यांचं मत विचारतात. त्यामुळे अजितदादा चिडतात. त्यांना ते आवडत नाही. त्यांनी अनेकदा पत्रकारांना याबाबत सांगितलंही आहे. पण पत्रकार तरीही त्यांना तेच तेच प्रश्न विचारत असतात. त्यामुळे दादांचा पारा चढतो. आजही त्याचं प्रत्यंतर आलं. पत्रकारांनी त्यांना अमोल मिटकरींबाबत (amol mitkari) विचारलं आणि त्यांचा पारा चढला. तुम्ही मला नको ते प्रश्न विचारू नका. नाही तर मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलणं बंद करेन, असं अजितदादा संतप्त होऊन म्हणाले. त्यामुळे पुढे काय विचारावं अशी पत्रकारांची गोची झाली.
अजित पवार आज पुण्यात आहेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विजेचं संकट, कोळश्याचा तुटवडा, भारनियमनाचं संकट, केंद्राशी चर्चा, कॅबिनेटचे निर्णय यावर भाष्य केलं. ही माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वादावर विचारलं. त्यावर अजितदादा संतापले. तुम्हाला किती वेळा सांगितलं. कुणी काय बोललं त्यावर मला विचारू नका. मला विकासाचं विचारा. मी बोलायला तयार आहे. पण तुम्ही नको ते प्रश्न विचारले तर तुमचा कॅमेरा आला तर बोलायचंच बंद करेन, असं अजितदादा संतप्त होत म्हणाले.
वीज प्रश्नावर अजितदादा काय म्हणाले?
अजित पवार यांनी वीज प्रश्नावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने वीज टंचाई निर्माण झाली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील कोळश्याच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारला कळवलं आहे. कमी दिवसाचा कोळसा आहे. तो वाढवून द्या, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. याशिवाय मार्केटमध्ये जिथे वीज आहे ती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबाबतची कॅबिनेटने परवानगी दिली आहे. भारनियमन होणार नाही याची खबरदारी घेतली आहे, असं अजित पवार म्हणाले. वीज संकटात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळे मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Ajit Pawar: मार्केटमधून वीज खरेदी करणार, पण भारनियमन होऊ देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही
Real Estate: मुंबई शहर आणि उपनगरात बिल्डरांविरोधात सर्वाधिक तक्रारी! खालोखाल ठाणे, पुणेही