मुख्यमंत्र्यांनी आजी-माजी-भावीचं वक्तव्य केलं आणि चर्चेला उधाण, पण अजित पवारांची प्रतिक्रिया काय?

ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. (Ajit Pawar)

मुख्यमंत्र्यांनी आजी-माजी-भावीचं वक्तव्य केलं आणि चर्चेला उधाण, पण अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 5:44 PM

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, अशी सावध प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. (ajit pawar reaction on cm uddhav thackeray’s statement on bjp)

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. प्रत्येकाला काय बोलायचे तो अधिकार आहे. त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. माझ्याशी बोलताना ते नेहमी राज्याला पुढे नेण्याविषयी बोलत असतात, असं अजित पवार म्हणाले.

ते मोदींनाच माहीत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हटल्याचं अजितदादांच्या लक्षात आणून दिलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. चंद्रकांत पाटील काय म्हणाले हे मला माहीत नाही. मी माझ्या कामावर लक्ष देतो. चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील तर त्याबाबत पंतप्रधान मोदींनाचा माहीत असेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

पालिका प्रभाग पद्धतीवर लवकरच निर्णय

महापालिका निवडणुकीत बहुप्रभाग पद्धती असावी, एक प्रभाग पद्धती असावी की दोन प्रभाग पद्धती असावी यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे, असं सांगतानाच नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

सतत नकारात्मक विचार करा करायचा?

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशावरही भाष्य केलं. निर्णय घेतला नाही तर का घेत नाही? घेतला तर टिकणार नाही, अशी टीका करणं योग्य नाही. आपण सदा सर्वदा नकारात्मकच विचार का करायचा? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

रस्ते कामाबाबत अजित पवार यांच्या सूचना

मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील सुविधांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

औद्योगिक परिसरातील समस्या त्वरित सोडवा

बैठकीत निवासी परिसर रस्त्यावरील सीसीटीव्ही, उद्यान, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, एसटीपी प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, खेळाचे मैदान, अग्निशमन केंद्र आदींबाबत चर्चा करण्यात आली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक परिसरातील समस्या त्वरित सोडवाव्यात. नागरिकांना नव्या सुविधांमुळे दीर्घकालीन लाभ होईल, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. (ajit pawar reaction on cm uddhav thackeray’s statement on bjp)

संबंधित बातम्या:

अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्याची कामे वेगाने करा, अजितदादांचे अधिकाऱ्यांना आदेश

VIDEO : मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात कार्यक्रम, राज्यपाल भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, तुळजाभवानी माता की जय!

(ajit pawar reaction on cm uddhav thackeray’s statement on bjp)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.