कोयता गँगवरुन अजित पवार यांचा पोलिसांना कानपिचक्या, असे पायंडे पाडू नका
वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कारण ते मोठे गुंड होते अन् फरार होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर चुकीचे आहे.
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत (Terror) कमी होत नाहीय. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. काही दिवसांपुर्वी प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले. त्यात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Attack on Student) केला होता. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर टीका केली होती. राज्यात एवढं सगळं होतंय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. असे त्या म्हणाल्या होत्या.
काय म्हणाले अजित पवार
कोयता गँगसंदर्भात पोलिसांनी घेतलेल्या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोध पक्ष नेते अजित पवार संतापले. अजित पवार म्हणाले, एखादा मोठा गुंड सापडत नसेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं जातं. मात्र सरसकट बक्षीस जाहीर होत असेल तर पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बक्षीसांचे आमिष दाखवणे योग्य नाही.कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिस यंत्रणेचे काम आहे. जर बक्षीस देऊन ही कामे झाले तर पोलीस यंत्रणेचे काय काम?
केव्हा देतात बक्षीस
वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कारण ते मोठे गुंड होते अन् फरार होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणा काय करेल. पोलिसांनी असे नवीन पायंडे पाडू नये, अशा शब्दात अजित पवार यांनी फटकारले.
काय घेतला होता पोलिसांनी निर्णय
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकतीच विविध बक्षीस जाहीर केली होती. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास 3 हजारांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडल्यास 10 हजार बक्षीस मिळणार आहे. मकोका किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर केले होते.
शाळांमध्ये समुपदेशन
भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.