संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार का? अजित पवार बघा काय म्हणाले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. संभाजी भिडे यांच्यावर सरकारकडून काही कारवाई केली जाईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार का? अजित पवार बघा काय म्हणाले
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 7:42 PM

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात सर्वत्र टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भूमिका मांडली. “संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. अहो, एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशी होणार ना? चौकशी झाल्यानंतर पोलीस कुठल्या कलमाखाली काय करायचं याबाबत पुढची अॅक्शन घेणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

“राज्यात कुठल्याही महापुरुषांबद्दल कुणीही वाचाळवीरांनी असं बेताल वक्तव्य केलेलं कोणतंही सरकार खपवून घेणार नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील तीच भूमिका आहे. माझीही तीच भूमिका आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आपली भूमिका मांडली”, असं अजित पवार म्हणाले.

“महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा हे देखील काही लोकांचे श्रद्धास्थान आहे. या देशात आपण संविधानाचा आदर करतो. कायदा-सुव्यवस्थेने देश आणि राज्य चालावा असं म्हणत असतो, त्यावेळेस प्रत्येकाला श्रद्धा आणि भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फक्त त्या भावना व्यक्त करत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

‘पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप होणार नाही’

“संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वांनी तीव्र शब्दांत निषेधच केला आहे. पोलीस कारवाई करतील. त्यांची चौकशी झाल्यानंतर पोलिसांना जे काही कलम वापरायचे आहेत, जे निर्णय घ्यायचे आहेत ते पोलीस घेतील, यात काही राजकीय हस्तक्षेप होणार नाही”, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.