‘बारामतीकरांना सुप्रिया सुळेंनाच विजयी करायचं होतं’, अजित पवारांचा गौप्यस्फोट

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. खासदार सुप्रिया सुळे यांचा या निवडणुकीत विजय झाला. या निवडणुकीवर अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

'बारामतीकरांना सुप्रिया सुळेंनाच विजयी करायचं होतं', अजित पवारांचा गौप्यस्फोट
अजित पवार, सुप्रिया सुळेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 4:44 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारातमी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नवा गौप्यस्फोट केला. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. या निकलावर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी भाष्य केलं. “मागं जाताना मी फार जोरात जायचो. लोकसभेचा निकाल थोडा वेगळा लागला. बारामतीकरांनी ठरवलं होतं खासदारकीला ताईंना निवडून द्यायचं. त्यामुळे बऱ्याच घरातले काही काही तर म्हणायचे, आमचे चार मते आहेत. दोन दादांना दोन साहेबांना. काहींनी तर चारहीचे चारही मते साहेबांना असंही केलं. पण आता पुढं कुणाला संधी द्यायची ते तुम्ही बघा. परंतु हे झालं आहे. ते नाकारू शकत नाही. अल्पसंख्याक समाज माझ्यापासून दूर गेलेला पाह्यला मिळाला”, असं अजित पवार म्हणाले.

“महाराष्ट्र शासनाने बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत एप्रिल, मे जूनचं चालू वीज बिलाचा पहिल्या हप्त्याचा भरणा सरकारने केलं आहे. वीज बिलमाफ केलं म्हणजे १४ हजार ९०० कोटी रुपये आम्ही महावितरणला भरले. त्यामुळे वीज बिल माफ केलं. या योजनेनुसार तुम्हाला झिरो बिल दिलं जाईल. तुम्ही पुन्हा महायुतीचं सरकार आणा. काही लोकांना वाटतं पुढे काय? तर ते तुमच्या हाती आहे. जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळाला, जिथे कमळ असेल तिथे कमळाला आणि जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाला बटन दाबलं तर तुम्हाला पुढेही झिरो बिल दिलं जाईल”, असं अजित पवारांनी सांगितलं.

‘पाच वर्षात तीनच वर्ष काम करायला मिळाली’

“तुम्ही माझ्या टर्म आठवा. मला पाच वर्षात तीनच वर्ष काम करायला मिळाली. एक वर्ष विरोधी पक्षात गेले. एक वर्ष कोरोनात गेलं. तीन वर्षात मी काही हजार कोटी बारामतीसाठी आणले. सर्व घटकांसाठी पैसे आणले. तुमच्यामुळे यश मिळालं. यावेळी पहिल्यांदा बारामतीत असे स्पॉट डेव्हल्प केले आहेत. परवा ९६ कोटींची योजना मंजूर केली. अजूनही काही गोष्टी करणार आहे. पण मन लावून काम केलं पाहिजे”, असं मत अजित पवार यांनी मांडलं.

“जिथं चुकीचं असेल ते बारामतीकरांनी सांगावं. तुमचं नाव गुपित ठेवतो. आपली नवीन पिढी बरबाद करत आहेत. वाईट वाटून घेऊ नका. आम्ही मध्ये सर्व्हे केला. या प्रकाराला १०० टक्क्यातील ६० ते ७० टक्के प्रकार घरातील माणसं करत आहेत. घरातील नातेवाईक करत आहेत. आलेल्या तक्रारीवरून हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. महिलांची काळजी घ्या. शेवटी प्रत्येकाच्या घरात आया बहिणी असतात. काही तर इतके नराधम, विकृत आणि नालायक माणसं असतात. मुलीशीही संबंध ठेवायला कमी पडत नाही. त्यांना नालायकच म्हटलं पाहिजे ना”, असं परखड मत अजित पवारांनी मांडलं.

“राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यावर मी हसताना दिसतो. अजित दादा महिलांमध्ये मिसळून राखी बांधत आहे. मी विरोधकांवर टीका केली नाही. मला त्यांच्यावर टीका करायची आहे. आम्ही ज्या योजना दिल्या आहेत. त्या योजना तुम्हाला सांगायच्या आहेत. आम्ही केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्याची आठवण करून द्यावी लागेल. पुढं आमचं व्हिजन काय आहे. आम्ही पुस्तक काढलं ते पाहा. या बारामतीच्या इमारती आहे का याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. प्रत्येक गोष्ट मी बारकाईने बघत असतो. सहा महिने लक्ष नाही दिलं तर काय होईल हे पाहा. पण जिथे पिकतं तिथे विकत नाही”, अशी खंत अजित पवारांनी मांडली.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.