Ajit Pawar : कोरोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी निर्बंधांबाबत दोन आठवडे थांबून निर्णय, अजित पवारांची रोखठोक भूमिका

कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी दोन आठवडे थांबून कोरोना निर्बंध शिथील करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : कोरोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी निर्बंधांबाबत दोन आठवडे थांबून निर्णय, अजित पवारांची रोखठोक भूमिका
ajit pawar
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 12:36 PM

पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कोरोना ( Corona) स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येरवडा स्लॅब दुर्घटना, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती, कोरोना रुग्णांची संख्या, कोरोना निर्बंध (Corona Restrictions ) यासह इतर मुद्यांवर भाष्य केलं. येरवडा येथे स्लॅब कोसळून जो अपघात झाला,बांधकाम करताना जे नियम करण्यात आले आहे त्यात कुचराई झाली आहे. मृत कामगार बिहार राज्यातील होते, 5 लोकांना मृत घोषित करण्यात आले होते. 4 कामगारांवर उपचार सुरू आहे,त्यांची तब्बेत बरी आहे. मृतांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, जखमींचा खर्च सरकार करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी दोन आठवडे थांबून कोरोना निर्बंध शिथील करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

रुग्णसंख्येत घट मात्र निर्बंथ लगेच हटवणार नाही

जगात आणि देशात नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, मृतांची आकडेवारी वाढत आहे. मृत्यू का वाढत आहेत या कारणांचा शोध घेत आहोत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्के देशात घट झालीय, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 42 टक्के घट झाली आहे. तर, पुण्यात गेल्या आठवड्यात सक्रीय रुग्ण 90 हजार होती होती. आता पुण्यात 45 हजार रुग्ण आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात परिस्थिती चांगली आहे. मात्र, रुग्ण जरी कमी झाले असले तरी घाईगर्दीत निर्णय घेणार नाही. अजून एक किंवा दोन आठवडे थांबणार मगच शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

पुणे आणि पिंपरी चिचंवडमधील 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवणार

पुण्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहर आणि पिपंरी चिचंवड येथे मुलांचं लसीकरण मागं पडलंय. 15ते 18 वयोगटातील मुलांना लस ज्या प्रमाणात लस उपलब्ध पाहिजे तशी उपलब्ध होत नाही, अशी माहिती मिळाली आहे. मी मुंबईला गेल्यावर केंद्रांशी बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले. जम्बोबाबत 28 फेब्रुवारी पर्यंत वाट बघणार त्यांनतर निर्णय घेणार, कारण त्याला भाडं द्यावं लागत आहे.

पहिली ते आठवीचे वर्ग पूर्ण दिवसभ भरणार

गेल्या आठवड्यात आपण पहिली ते आठवी शाळा हाफ डे सुरु केल्या होत्या. आता या आठवड्यापासून शाळा पूर्ण दिवस सुरू राहणार असल्याचं अजित पवार म्हणाले. विविध स्पर्धा आता 25 टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. मात्र परवानगी देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर असणार आहेत. राज्याच्या गाईडलाईननुसार स्पर्धा सुरू करणार असल्याचं ते म्हणाले.

आरोप प्रत्यारोप, माफी दिलगिरी कोणत्या थराला जातंय

जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर पुरावे द्या चौकशी करून सिद्ध झालं तर कारवाई करणार असल्याचं प्रत्युत्तर अजित पवार यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे. मला या गोष्टीत रस नाहीय रोज नुसते आरोप प्रत्यारोप सुरुय, नंतर माफी मागितली जातेय, बंडातात्या कराडकर यांचे नाव न घेता अजित पवार यांनी हा टोला लगावला. मला अशा कोणत्याही प्रकरणात इंटरेस्ट नाही, राज्यकर्ते म्हणून ज्यांची जबाबदारी असेल त्यांनी घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या टीमचं चांगलं काम

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांची टीम चांगलं काम करतेय. राज्यांच्या मुख्य सचिवांना प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून काय घडतंय याची माहिती घेण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना विचारलं तर त्याबद्दल सचिवांनी माहिती सांगायला नको का? तपासाबद्दल माहिती घेणं वेगळं आणि तपासात हस्तक्षेप करणं वेगळं असतं, असं अजित पवार म्हणाले.

येरवडा दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

येरवडा दुर्घटना प्रकरणी जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.या समितीला अहवाल तातडीने द्यायला सांगितला आहे. अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या:

Pune School | पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; कोरोना निर्बंधात तूर्तास शिथिलता नाही – अजित पवार यांची घोषणा

Pune ZP Recruitment Scam | पुणे जिल्हा परिषद बोगस भरतीतील तब्बल 626 कर्मचाऱ्यांना दिला नारळ…., काय आहे घोटाळा?

Ajit Pawar said corona cases declined but restrictions decision will take after two weeks

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.