पुण्यात अजित पवार यांना हादरा, २४ वर्षांपासून असलेल्या वर्चस्वाला बसला धक्का

Pune Ajit Pawar : राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यात अजित पवार यांना भाजपने धक्का दिला. अजित पवार यांचे २४ वर्षांपासून वर्चस्व असलेली बाजार समिती आता राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या ताब्यात गेली आहे.

पुण्यात अजित पवार यांना हादरा, २४ वर्षांपासून असलेल्या वर्चस्वाला बसला धक्का
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 1:53 PM

योगेश बोरसे, पुणे : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरसी झाली. परंतु राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यात अजित पवार यांना भाजपने धक्का दिला. अजित पवार यांचे २४ वर्षांपासून वर्चस्व राहिलेल्या बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनल विजयी झाले. आता अजित पवार यांचे विरोधक हवेली बाजार समितीत अध्यक्ष झाले आहे.

कोणाची अध्यक्ष म्हणून निवड

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपची एकहाती सत्ता आली. राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची सभापतीपदी निवड झाली. तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलला धक्का देत बाजार समितीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

हवेलीकडे होते राज्याचे लक्ष

पुणे जिल्ह्याचे लक्ष हवेली बाजार समितीकडे होते. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना होता. भाजपने राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल तयार केले होते. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या पॅनलला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. तीन अपक्षांनीही बाजी मारली. हवेली बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांचे २४ वर्षांपासून वर्चस्व होते. आता त्या ठिकाणी राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड झाली.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश

पुणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. फक्त हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. इंदापूर, बारामती, मंचर, नीरा बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आली. यामुळे पुण्यात राष्ट्रवादीचा गड आला पण हवेलीच्या माध्यमातून सिंह गेला अशी परिस्थिती झाली. हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देताना राष्ट्रवादीने आयात उमेदवारांना प्राधान्य दिले. त्यामुळे पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले. राष्ट्रवादीतील सर्व नाराज एकत्र आले. त्यांनी भाजप, शिवसेना ठाकरे गटास मदत केली. यामुळे राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.