‘प्रतिभा काकी प्रचाराला आल्या, मी तर कपाळाला हात लावला’; अजित पवार यांचा टोला

"माझा परिवार सोडून बाकीचा सर्व परिवार पायात भिंगरी लावून प्रचारात फिरत आहे. काल परवा प्रतिभा काकी प्रचाराला आल्या. मी तर कपाळाला हात लावला", असं अजित पवार म्हणाले. ते वकिलांच्या मेळाव्यात बोलत होते.

'प्रतिभा काकी प्रचाराला आल्या, मी तर कपाळाला हात लावला'; अजित पवार यांचा टोला
अजित पवार, शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 8:31 PM

बारामतील पवार कुटुंबातील दोन महिला या समोरासमोर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडून सभांमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. अजित पवार यांनी टीका करताना आज त्यांच्या काकू आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यादेखील नावाचा उल्लेख केला. ते वकिलांच्या मेळाव्यात बोलत होते. “आरोग्य बाबतीत अनेक हॉस्पिटल उभी करीत आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 4 वेळा मुख्यमंत्री काळात झालेले निर्णय, आणि मी 6 वेळा उपमुख्यमंत्री असताना झालेले निर्णय, मी घेतलेले निर्णयात विकासकामे नक्कीच जास्त आहेत”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

“डॉक्टर पेक्षा वकील गुंतवणूक जास्त करतात. मी उपमुख्यमंत्री नसताना बारामतीत जागेचे भाव खाली आले होते. 1990 च्या आधीची बारामती आठवून पाहा. खऱ्या अर्थाने 1990 नंतर बारामती सुधारत गेली. बारामतीची बाजारपेठ 12 महिने चालू आहे. काही लोक माझ्या समोरच्या बाजूला प्रचार करतात. ते मला खटकतं. लोकसभा राहुद्या, विधानसभेला बघू, असं काहीजण म्हणतात. पण माझे बारामतीकर मला ढिगान मते देऊन निवडून देतील. माझा परिवार सोडून बाकीचा सर्व परिवार पायात भिंगरी लावून प्रचारात फिरत आहे. काल परवा प्रतिभा काकी प्रचाराला आल्या. मी तर कपाळाला हात लावला”, असं अजित पवार म्हणाले.

‘संविधान कुणीही बदलू शकत नाही’

“चंद्र, सूर्य असेपर्यंत संविधान कुणीही बदलू शकत नाही. मी 10 वर्षांपासून सांगतोय. आपली रेल्वे लाईन बारामती ते फलटणला जोडा. मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो आणि ते म्हणाले काम मार्गी लावले. माझी मोदी यांच्याशी ओळख झाली म्हणून हे कामे होत आहे”, असा दावा अजित पवारांनी केला.

“मला बारामतीकरांनी नाव दिलं. लोकसभेला तिकडे मत आणि विधानसभेला इकडे मत ही बारामतीकारांची मानसिकता होती. त्यामुळे हा पत्ता खेळला पाहिजे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी मिळतंजुळतं घेतलं आहे. विकासकामे करायची असेल तर या बाबी कराव्या लागतात”, असं अजित पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.