तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, अजित पवार यांनी शरद पवार यांना सुनावले
sharad pawar and ajit pawar: अजित पवार यांनी शरद पवार यांना सुनावल्यानंतर वाद सुरु झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्याकडे जीआर आहे. त्या जीआरनुसार आमंत्रित सदस्य डीपीडीसीच्या सभेत प्रश्न विचारु शकतात. परंतु सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही पद्धतीने काम करायचे आहे. त्यांना घटना बदलायची आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. पवार कुटुंबियांमध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली. ते महायुतीसोबत गेले तर शरद पवार महाविकास आघाडीसोबत राहिले. त्यानंतर काका-पुतणे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शनिवारी पुण्यात एक वेगळीच घटना घडली. शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीत होते. त्यावेळी शरद पवार यांनी प्रश्न विचारला. परंतु तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही? असे अजित पवार यांनी सुनावले. या घटनेची चर्चा चांगली होत राहिली.
अजित पवार यांची प्रश्नावर नाराजी
जिल्हा नियोजन समितीमध्ये (डीपीडीसी) हा किस्सा शनिवारी घडला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री म्हणून अजित पवार होते. त्यावेळी खासदार म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी प्रश्न विचारला. तहसीलदारांनी कुठे किती फंड दिली आहे? ते आकडे दाखवा, असे शरद पवार यांनी विचारले. शरद पवार यांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही फक्त निमंत्रित सदस्य आहोत, बैठकीत तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. बैठकीत फक्त जिल्हा नियोजन समितीचे सदस्यच प्रश्न विचारु शकतात, हा नियम त्यांनी दाखवून दिला.
प्रोटोकॉलचे शरद पवार यांच्याकडून पालन
बैठकीसाठी अजित पवार येताच शरद पवार उठून उभे राहिले. अजित पवार अध्यक्ष असल्यामुळे प्रोटोकॉलचे पालन करत शरद पवार उठून उभे राहिल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या घटनेतून सर्वांनी शिकायला पाहिजे. राजकारण राजकारणाचा ठिकाणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार खासदार म्हणून या बैठकीत सहभागी झाले होते.




सुप्रिया सुळे यांचा दावा
अजित पवार यांनी शरद पवार यांना सुनावल्यानंतर वाद सुरु झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्याकडे जीआर आहे. त्या जीआरनुसार आमंत्रित सदस्य डीपीडीसीच्या सभेत प्रश्न विचारु शकतात. परंतु सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही पद्धतीने काम करायचे आहे. त्यांना घटना बदलायची आहे. शरद पवार यांनी निधी वाटपासंदर्भात प्रश्न विचारला होतो. त्याचे उत्तर दिले गेले पाहिजे होते.
अजित पवार यांचे स्पष्टीकरण
डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकले त्याचे रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काही जण म्हणतात की, मी साहेबांना बोलू दिले नाही, अरे मी कसा बोलू देणार नाही? असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.