AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीच्या विकासाचे मॉडेल कसे उभे राहिले?, अजित पवार यांनी सांगितलं

अनेक सहकारी तिथं राबत असतात. कष्ट घेत असतात. खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, इतर सहकारी, घरातील महिला भगिनी सगळे जण राबत असतात.

बारामतीच्या विकासाचे मॉडेल कसे उभे राहिले?, अजित पवार यांनी सांगितलं
Updated on: Apr 21, 2023 | 8:38 PM
Share

पुणे : बारामतीचे विकासाचे मॉडेल देशात माहिती आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बारामती काही एका दिवसात तयार झाली नाही. १९६७ साली बारामतीला शरद पवार यांच्यासारखं नेतृत्व लाभलं. त्यावेळी २१ गावं बागायती होती. ४२ गाव जिरायती होती. तेव्हा ६३ गावांची ती बारामती होती. त्यावेळी अप्पासाहेब पवार यांनी बारामतीत काम केलं. अनेक सहकारी तिथं राबत असतात. कष्ट घेत असतात. खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, इतर सहकारी, घरातील महिला भगिनी सगळे जण राबत असतात. आम्ही करताना जे चांगले अधिकारी आणतो. एका मुलाखतीत अजित पवार आज बोलत होते.

पिंपरी चिंचवडचा कालापालट करत असताना १९९१ ला खासदार झालो तेव्हा पुण्यातली लोकं बजाज, टेलको कंपनीत कामासाठी यायचे. संध्याकाळ झाली की, ते परत पुण्यात जायचे. कारण त्यांना चांगल्या सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये मिळत नव्हत्या. त्यामुळे महत्त्वाच्या सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये तयार केल्या. जेणेकरून पुण्यातल्या व्यक्तीला पिंपरी चिंचवडमध्ये राहता आलं पाहिजे. असं मनामध्ये ध्येय ठेवून कामाला लागलो.

त्यामुळे काम करणे सोपे झाले

शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि अधिकाऱ्यांची उत्तर साथ मिळाली. सतत पाच टर्म आमच्या विचाराचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काम करणे सोपे गेले. केंद्रात शरद पवार असल्याने केंद्राचा निधी आणता आला. राज्यात आम्ही मंत्री होतो. त्यामुळे निधी आणता आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास झाला असल्याचं अजित पवार यांनी म्हंटलं.

टीमवर्क असावे लागते

कोणत्याही भागाचा विकास हा एका व्यक्तीने होत नाही. टीमवर्क असावे लागते. कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी शेवटच्या माणसापर्यंत व्हावी लागते. त्यासाठी टीम कामाला झोकून देणारी हवी असते. तेव्हा बदल होत असतात. स्वतःच्या घरचं काम आहे, असं समजून सकाळी सहा वाजता कामाच्या पाहणीला सुरुवात करतो, अस अजित पवार यांनी सांगितलं.

घरचे काम आहे समजून करतो

आमची जबाबदारी आहे. कर्तव्य आहे म्हणून आम्ही काम करतो. लोकांच्या विश्वासाला तडा घालू दिला जात नाही. आपली टर्म संपल्यानंतर लोकांनीही आपल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश.
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर.
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य.
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?.
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया.
अनिल पवारांची शिफारस केली होती? दादा भुसेंची मोठी प्रतिक्रिया
अनिल पवारांची शिफारस केली होती? दादा भुसेंची मोठी प्रतिक्रिया.
राज्यात फडणवीस अ‍ॅक्ट लागू! संजय राऊतांची खणखणीत टीका
राज्यात फडणवीस अ‍ॅक्ट लागू! संजय राऊतांची खणखणीत टीका.
वसई-विरार ईडीच्या कारवाईवर दादा भूसेंची मोठं विधान
वसई-विरार ईडीच्या कारवाईवर दादा भूसेंची मोठं विधान.