पवार कुटुंबात पाडव्यातील फुटीनंतर आता भाऊबीज झाली का? अजित पवार सुप्रिया सुळेंकडे जाणार की नाही? स्पष्टच सांगितले

bhaubeej celebrates in baramati: कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. जेव्हा काही फॅमिली कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊ. आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. आता ते कधी जुळणार नाहीत. युगेंद्र पवार यांना दिलेली उमेदवारी आम्हाला आवडलेली नाही.

पवार कुटुंबात पाडव्यातील फुटीनंतर आता भाऊबीज झाली का? अजित पवार सुप्रिया सुळेंकडे जाणार की नाही? स्पष्टच सांगितले
अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीज साजरी करतानाचा जुना फोटो
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 9:48 AM

bhaubeej celebrates in baramati: महाराष्ट्रातील राजकारण पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे. कधीकाळी एकत्र असलेले काक-पुतणे आता राजकीय विरोधक आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे साजरा होणाऱ्या दिवाळी पाडव्याला अजित पवार यांनी जाणे टाळले. त्याची चर्चा राज्यातील राजकारणात रंगली आहे. त्यानंतर येणाऱ्या भाऊबीजेला अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊ बहीण एकत्र येणार का? हा प्रश्न होता. त्यावर अजित पवार यांनी रविवारी सकाळीच उत्तर देत विषय संपवला.

काय म्हणाले अजित पवार

मला लाडक्या बहिणींनी सकाळी ओवाळले आहे. त्यामुळे मी भाऊबीजेला जाणार नाही. आता मी कार्यक्रम संपवातोय, अशा मोजक्या शब्दांमध्ये अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अजित पवार सुप्रिया सुळे यांच्याकडे भाऊबीज साजरी करण्यासाठी जाणार नाही, हे स्पष्ट झाले. पाडव्यानंतर भाऊबीज कार्यक्रमासाठी पवार कुटुंबीय एकत्र आले नाही, हे पुन्हा दिसून आले.

दोन पाडवे कायम राहणार

पवार कुटुंबातील दिवाळी पाडव्यासंदर्भात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता दोन दिवाळी पाडवे आता कायम राहणार आहे. कार्यकर्त्यांची भावना होती आपण वेगळा पाडवा करायला पाहिजे. त्यामुळे वेगळा पाडवा केला गेला. आता हे कायम करणार आहोत. एकत्र पाडवा केला असता तर जनतेत संभ्रम निर्माण झाला असता. दोन पक्ष आणि एकत्र येतात हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

कुटुंब म्हणून आम्ही एकच

पार्थ पवार पुढे म्हणाले, कुटूंब म्हणून आम्ही एकच आहोत. जेव्हा काही फॅमिली कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही एकत्र येऊ. आमचे राजकीय विचार वेगळे आहेत. आता ते कधी जुळणार नाहीत. युगेंद्र पवार यांना दिलेली उमेदवारी आम्हाला आवडलेली नाही. मात्र आता सामोरे जावे लागणार आहे. हे आता कायम असणार आहे. हे थांबायला पाहिजे होते, मात्र आता थांबणार नाही. एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न केले मात्र यश आले नाही, आता विषय सोडला आहे. मी शरद पवार यांना भेटायला नेहमी जातो. यावेळी पण जाणार आहे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जायला पाहिजे,असे पार्थ यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.