पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना ओमिक्रॉनचा कहर, कडक निर्बंध लागणार? अजित पवारांची तातडीची आढावा बैठक
पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना (Corona) रुग्ण आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासात 10 हजार पेक्षा जादा कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं समोर आलं आहे.
पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना (Corona) रुग्ण आले आहेत. मात्र, गेल्या 24 तासात 10 हजार पेक्षा जादा कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कठोर होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची कोरोना बैठक बोलवालीय. या बैठकीत अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासात रुग्णसंख्या दहा हजारापार गेलीय. दिवसभरात पुण्यात 10 हजार 76 रुग्णसंख्या आढळून आली. तर, 2 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांवर गेली असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील गेल्या महिन्यांतील सर्वात उच्चांकी रुग्णसंख्या असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचंही दिसून आलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध आणखी कठोर होणार का हे पाहावं लागणार आहे.
अजित पवार यांची दुपारी तातडीची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोना आढावा बैठक घेण्यात येणार आहे. आज 4 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत बूस्टर डोस आणि निर्बंधासंदर्भात अजित पवार आढावा घेण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागणार का हे पाहावं लागणार आहे.
पुण्यात 24 तासात 10 हजार 76 रुग्ण
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून गेल्या 24 तासात रुग्णसंख्या दहा हजारापार गेली आहे. काल दिवसभरात 10 हजार 76 रुग्ण वाढले असून 2 जणांचा मृत्यू झालाय. पुणे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारावर गेलीय.
पुण्यात ओमिक्रॉनचा कहर
पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 197 रुग्णांची नोंद झाली आहे.तर राज्यात 238 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1605 रुग्णांची नोंद तर 859 रूग्णांना मिळाला डिस्चार्ज मिळाला आहे. ओमिक्रॉनचे पिंपरी चिंचवडमध्ये 32 रुग्ण आढळून आले आहेत.
इतर बातम्या:
Ajit Pawar will take corona review meeting today corona restrictions may be increased in Pune and PCMC