अजित पवारांची विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूरमध्ये जाहीर सभा; राजकीय वातावरण तापलं

अजित पवार इंदापूरमधील जाहीर सभेत नेमके काय बोलतात याकडे सबंध तालुक्यासह राजकीय क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेले आहे.(Ajit Pawar Indapur)

अजित पवारांची विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूरमध्ये जाहीर सभा; राजकीय वातावरण तापलं
अजित पवार दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 4:36 PM

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमचं इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार 6 फेब्रुवारीला इंदापूर शहरात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार त्या सभेत नेमके काय बोलतात याकडे सबंध इंदापूर तालुक्यासह राजकीय क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी अजित पवार इंदापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत.(Ajit Pawar will visit first time after Assembly Elections and address public meeting)

अजित पवार विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच इंदापूर शहरात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्याचे राजकारण सध्या तापलेले दिसून येत आहे. अजित पवार इंदापूर मध्ये आल्यानंतर नेहमीच विरोधकांवर कडाडून टीका करत असतात. अजित पवारांची भाषाशैली व भाषण ऐकण्यासाठी तालुक्यातील हजारो नागरिक गर्दी करत असतात. त्यामुळे सहा तारखेला होणाऱ्या सभेत ते नेमके काय बोलतात याकडे विरोधकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा इंदापूर नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. दत्तात्रय भरणे यांनी यावेळी नूतन इमारतीच्या सर्व बाबी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदार यांना इमारतीच्या काही दुरुस्त्या व्यवस्थित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. यानंतर इंदापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये सदर कार्यक्रमाची सभा आयोजित करण्यात आली असून त्या ठिकाणाची पाहणी भरणे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग?

अजित पवार यांच्या सभेत राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या अनेक बड्या नेत्यांचे प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या इंदापूर तालुक्यात रंगत आहेत. त्यात भाजपच्या अनेक नेत्यांचे नावे घेतली जात आहेत. त्यामुळे सहा तारखेला मोठे प्रवेश होणार याची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगत आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना या जाहीर सभेत अनेक बड्या नेत्यांचे प्रवेश होणार आहेत याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे नकार देत हा कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा आहे. यात कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पवार पाटलांवर ती तोफ डागणार का???

आगामी काळात इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही कारखाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट करणार का? भाषणात त्यांच्यावरती निशाणा साधणार का?  हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या: नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत,अजित पवारांचा भाजपला टोला

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

(Ajit Pawar will visit first time after Assembly Elections and address public meeting)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.