Pune crime : बनावट कॉल करून रुग्णांची फसवणूक, पुण्यात प्रकार वाढले; प्रकरण नेमकं काय? वाचा सविस्तर…

काही खासगी रुग्णालयांमध्ये अशाच प्रकारचे बनावट कॉल येत असल्याची तक्रार आहे. रूबी हॉल क्लिनिकचे सुरक्षा प्रमुख कर्नल रवी कुमार (निवृत्त) यांनी अशाच घटनांची नोंद केली.

Pune crime : बनावट कॉल करून रुग्णांची फसवणूक, पुण्यात प्रकार वाढले; प्रकरण नेमकं काय? वाचा सविस्तर...
ससून हॉस्पिटल, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:43 AM

पुणे : बनावट कॉल करून रुग्णांची फसवणूक होत असल्याचे प्रकार पुण्यात निदर्शनास येत आहेत. ससून जनरल हॉस्पिटलच्या (SGH) अधिकार्‍यांनी नुकतीच अशा दोन घटनांची नोंद केली आहे. यात रूग्णांच्या कुटुंबीयांना रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून पैसे मागण्यासाठी कथित बनावट कॉल आले आहेत. याप्रकरणी रुग्णालयाच्या वतीने तक्रार (Complaint) दाखल करण्यात आली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. बीजे जनरल मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. विनायक काळे यांनी सांगितले, की निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) यांनी या घटनेची माहिती देणारे पत्र पाठवले आहे. आरएमओने या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. रुग्ण, परिचारिका आणि वॉर्ड बॉय यांना अशा प्रकारच्या कॉल्सचा विचार न करण्याच्या लेखी सूचना दिल्या जातील, असे डॉ. काळे म्हणाले.

आरएमओच्या नावाने कॉल

बीजे जनरल मेडिकल कॉलेज आणि एसजीएचच्या अधीक्षक डॉ. भारती दासवानी यांनी सांगितले, की डीनला अधिकृत पत्र पाठवण्यात आले असून बंडगार्डन रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा किमान दोन घटना घडल्या आहेत, ज्यात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना कथितपणे आरएमओच्या नावाने कॉल आले आहेत. यासंबंधी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, असे डॉ दासवानी म्हणाल्या. कॉलर रुग्णांना रिक्षाचालकाच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगतो. त्यानंतर तो रिक्षाचालकाकडून पैसे घेतो आणि चालकाला एक हजार रुपये देतो. एका ड्रायव्हरने संशयिताची ओळख पटवली, असे डॉ. दासवानी यांनी सांगितले.

फोन नंबर केले हॅक

काही खासगी रुग्णालयांमध्ये अशाच प्रकारचे बनावट कॉल येत असल्याची तक्रार आहे. रूबी हॉल क्लिनिकचे सुरक्षा प्रमुख कर्नल रवी कुमार (निवृत्त) यांनी अशाच घटनांची नोंद केली. अलीकडेच, आमच्या काही कर्मचाऱ्यांना असे बनावट कॉल आले. त्यांनी वेबसाइटवर अपलोड केलेले फोन नंबरही हॅक केले आहेत. आम्ही यापूर्वी सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधला होता, असे कुमार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यापूर्वीही घडल्या घटना

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनीही अशा घटना यापूर्वीही घडल्या असल्याचे सांगितले आहे. हे काही वर्षांपूर्वी घडले. पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केल्याने असे कॉल येणे बंद झाले. पण काही वेळाने पुन्हा कॉल सुरू झाले. यावेळी अशी कोणतीही घटना घडली नाही, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.