पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील शाळाही 1 फेब्रुवारी पासून होणार; या नियमावलीचे करावे लागणार पालन
शाळा,कॉलेज मधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं गरजेचं तर ज्याचे लसीकरण नसले झाले त्यांना 48 तासापूर्वीचा RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना शाळा, कॉलेज परिसर निर्जंतुकीकरणं करणे, कोविड संदर्भातील नियम दर्शनी भागावर लावणे देखील गरजेचं असणार आहे.
पिंपरी चिंचवड- पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड मधील पहिली ते बारावी शाळा,कॉलेज1फेब्रुवारी पासून होणार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिली ते आठवी पर्यंत अर्ध सत्रात आणि नववी ते बारावीचे वर्ग नियमित स्वरूपात सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.