‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईल…, डॉक्टर घैसास अन् केळकर…,गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत आमदार गोरखे काय म्हणाले?
Pune Deenanath Mangeshkar Hospital: अमित गोरखे म्हणाले, मी आता रुग्णालयाचा अहवाल पाहिला. त्यांची चूक झाली आहे पण स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी अहवाल दिला आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी अहवाल दिला आहे. रुग्णाला कॅन्सर होता असे म्हटले तर एखादी महिला आठ महिन्यांची गर्भवती कशी राहू शकते

Tanisha Bhise death case: पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणावर आमदार अमित गोखले यांनी रुग्णालयाच्या अहवालात स्वत:वर बचाव करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात डॉ. घैसास आणि केळकर यांचे सीडीआर तपासा मग ‘दूध का दूध पानी का पानी’ समोर येईल, असे म्हटले आहे.
आमदार गोरखे काय म्हणाले?
अमित गोरखे म्हणाले, मी आता रुग्णालयाचा अहवाल पाहिला. त्यांची चूक झाली आहे पण स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी अहवाल दिला आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी अहवाल दिला आहे. रुग्णाला कॅन्सर होता असे म्हटले तर एखादी महिला आठ महिन्यांची गर्भवती कशी राहू शकते? या सर्व प्रकारात IBF द्वारे गर्भधारणा झालेली आहे. रुग्णालयाने दहा लाख मागितले हे स्पष्ट आहे. त्याची पावती आहे.
महाराष्ट्रातून अनेक फोन येत आहेत. रुग्णालयाची अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात. माझा घैसास यांचा विरोध नाही, त्यांच्या वृत्तीला विरोध असल्याचे आमदार अमित गोरखे म्हणाले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार जणांची समिती गठीत केली आहे. त्यातून सत्य समोर येणार आहे.




मुख्यमंत्र्यांकडून या समितीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात समितीची घोषणा केली आहे. पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. या समितीत उपसचिव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक, तसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.
महाराष्ट्रातील हॉस्पिटलची बैठक घेणार
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रकार घडला आहे. तो अत्यंत गंभीर आहे. पैशांच्या अभावी त्यांच्यावर उपचार न करता रुग्णाला बाहेर काढण्यात आले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांना आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रात अशा घडू नयेत म्हणून याची दखल घेतली पाहिजे. मुंबई गेल्यानंतर चॅरिटी कमिशनर महाराष्ट्रातील हॉस्पिटल मालकांची बैठक घेणार आहे, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.