काँग्रेसकडून बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने अपमान, अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला.

काँग्रेसकडून बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने अपमान, अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
amit shah
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 5:27 PM

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठं योगदान दिलं. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि केंद्रीय सहकारीता मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली.

अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात होते. शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारत रत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला, असा हल्ला शहा यांनी काँग्रेसवर चढवला.

संविधानानुसारच देशाचा कारभार

स्वातंत्र्यानंतर संविधान बनिवण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान राहिलं आहे. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. कटु अनुभव घेतले. पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारं संविधान आहे हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकलं, असं शहा म्हणाले. मोदीही भारताच्या संविधानाला आपला ग्रंथ मानून देश चालवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं

जेव्हा देशात अंधारयुग होतं. आशेचा एक किरणही दिसत नव्हती. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणंही जेव्हा कठिण होतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचं सौभाग्य मिळालं, असं त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्याच्या विकासात कसूर ठेवणार नाही

पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुण्याला लवकरच मेट्रो मिळेल. स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिल्या. मुळा मुठा निधी संवर्धनासाठी 110 कोटींचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ; फडणवीसांचा घणाघात

Akola | झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत!

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.