मनसेची पुणे लोकसभेसाठी मोठी तयारी, या बड्या नेत्यावर जबाबदारी

pune lok sabha | पुणे लोकसभा मतदार संघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पातळीवर सुरु झाली आहे. पुणे लोकसभेसाठी मनसेकडून बड्या नेत्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यानंतर या नेत्याचे पुणे दौरे वाढले आहे.

मनसेची पुणे लोकसभेसाठी मोठी तयारी, या बड्या नेत्यावर जबाबदारी
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 12:35 PM

प्रदीप कापसे, पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. या पाच राज्यातील निवडणुकीतील पहिल्या टप्प्यास आजपासून प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक ही लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये होणार असून त्यासाठी आचारसंहिता जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात लागणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेची तयारी सुरु केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना जबाबदारी दिली आहे.

अमित ठाकरे यांनी दिले लक्ष

अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभेवर लक्ष केंद्रित केलं आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहे. अमित ठाकरे पुन्हा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी अमित ठाकरे पुण्यात आहे. या दौऱ्यात ते प्रभागनिहाय आढावा घेणार आहे. त्यासाठी आज आणि उद्या मनसेच्या बैठकीचं सत्र आयोजित केले आहे. मनसेकडून लोकसभा निवडणुकीबरोबर मनपा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी चाचपणी अमित ठाकरे करणार आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेकडून कोण आहेत इच्छुक

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच मनसे कार्यकर्ते भावी खासदार म्हणून सातत्याने वसंत मोरे यांचा उल्लेख करत आहे. तसे बॅनरही लावले आहे. पुणे मनसे शहरध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामुळे राज ठाकरे यांची पसंत कोण ठरणार? हा महत्वाचा विषय आहे. राज ठाकरे यांनी मशिदीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर वसंत मोरे यांनी वेगळी वाट धरली होती. त्यानंतर राज ठाकरे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होत असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.