Video | वाहतूक कोंडी दिसताच अमोल कोल्हे रस्त्यावर, वाहतूक सुरळीत करण्यासाठी बनले वाहतूक पोलीस
traffic jam in pune and amol kolhe : पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी नवीन नाही. परंतु व्हीआयपी लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो तेव्हा चर्चेचा विषय होतो. खासदार अमोल कोल्हे वाहतूक कोंडीत अडकले. त्यानंतर त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरत वाहतूक सुरुळीत केली. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच शेअर झाला आहे.
अभिजित पोते, पुणे दि. 19 नोव्हेंबर | पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक उद्योग उभे राहिले आहेत. पुणे शहरात शिक्षणाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यामुळे पुणे शहर आणि परिसराचा विकास चौफेर झाला. देशभरातून पुणे शहरात येणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे पुणे शहरात आणि परिसरात मोठ्या संख्येने वाहनांचा वापर होऊ लागला. देशात सर्वाधिक दुचाकींची संख्या पुणे शहरात आहे. यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडींचा प्रश्न सातत्याने असतो. वाहतूक कोंडीचा फटका खासदार अमोल कोल्हे यांना बसला. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा चौकात वाहतुकीची कोंडीत खासदार कोल्हे अडकले. त्यानंतर खासदार कोल्हे रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.
खासदार कोल्हे अडकले वाहतूक कोंडीत
शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे मुंबईवरुन परत येत होते. मुंबईवरून आपल्या मतदार संघात जाताना सोमाटणे फाटा येथे वाहतूक कोंडीत ते अडकले. अनेक वाहने कोंडीत अडकल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर सोमाटणे फाटा चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत वाहतूक सुरुळीत केली. काही वेळेत त्यांनी वाहतूक सुरुळीत केली. त्यानंतर ते पुढील मार्गावर रवाना झाले.
खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उचलले पाऊल#Amolkolhe #Pune pic.twitter.com/wJJlqPFNrL
— jitendra (@jitendrazavar) November 19, 2023
सलग सुट्यांमुळे वाहतूक कोंडी
सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक जण गावी गेले होते. आता दिवाळीच्या सुट्या संपत असल्यामुळे आपआपल्या घरी चाकरमाने परतू लागले आहेत. सलग सुट्यांमुळे मुंबईवरून पुण्याच्या दिशेने एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी दिसली. दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या. त्यानंतर मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. या कोंडीत अडकल्यामुळे अमोल कोल्हे यांनी गाडीत बसून वाट पाहण्यापेक्षा स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी घाईगर्दीने जाणाऱ्या वाहनांना रोखत एक बाजू मोकळी करत वाट करुन दिली. त्यामुळे काही वेळेतच वाहतूक सुरुळीत सुरु झाली. वाहतूक सुरळीत करण्याचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.