VIDEO : आता पुणे शहराचं नामंतर होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र हिंदू महासंघानं त्याला विरोध केलाय.

VIDEO : आता पुणे शहराचं नामंतर होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 11:54 PM

पुणे : नामांतरांच्या मागण्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा पुण्याची (Pune) भर पडलीय. संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र हिंदू महासंघानं त्याला विरोध केलाय. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर प्रक्रियेत आहे. त्यात अहमदनगर आणि पुन्हा एकदा पुण्याच्या नामांतराची चर्चा सुरु झालीय. पुण्याचं नाव बदलून ते जिजापूर करावं , अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीय. मात्र या नामांतराच्या मागणीवरुन राष्ट्रवादी आणि हिंदू महासभा एकमेकांसमोर येण्याची चिन्हं आहेत. याआधी संभाजी ब्रिगेडनं पुण्याचं नाव जिजापूर किंवा जिजाऊनगर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी पुण्याला जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र पुण्याचं नाव पुणेच राहावं, अशी भूमिका हिंदू महासभेनं घेतलीय.

नामांतराचे समर्थक म्हणतात की, जिजामातांच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी पुण्याचं वैभव परत आणलं. विरोधकांच्या मते, राजमाता वंदनीय आहेत. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र पुणे नाव पुण्येश्वर महादेवामुळे पडलं, त्यात बदलाची गरज नाही.

समर्थकांच्या मते शिवरायांना घेऊन जिजामाता पुण्यात आल्या, आणि पुणे जिल्ह्यातूनच पुढे स्वराज्याची स्थापना झाली.

हे सुद्धा वाचा

विरोधकांच्या मते स्वतः शिवभक्त असूनही शिवरायांनी पुण्याचं नाव बदललं नाही. नामांतराची परंपरा भारतात काही नवीन नाही. अगदी मुगल काळापासून शहरांची नावं बदलत आली आहेत.

उदाहरणार्थ सोळाव्या शतकात औरंगाबादचं नाव खडकी होतं. 1660 मध्ये मलिक अंबरनं मुलाचं नाव म्हणून त्याला फतेह नगर केलं. औरंगजेब दख्खनमध्ये आल्यानंतर फतेहनगरचं औरंगाबाद झालं. आणि एकविसाव्या शतकात औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय झाला.

90 च्या दशकात बॉम्बेचं मुंबई, मद्रासचं चेन्नई आणि कलकत्त्याचं कोलकाता झालं.

2014 नंतर जर शहरं नामांतराची यादी काढली, तर देशातल्या जवळपास 25 शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. खासकरुन उत्तर प्रदेशात अजून 12 जिल्ह्यांचं नामांतर प्रस्तावित आहे.

अलीनगरचं आर्यनगर, फैजाबादचं अयोध्या आणि इलाहाबादलचं प्रयागराज ही नामांतरं झाली आहेत. याशिवाय अलीगढचं हरिगड, फिरोजाबादचं चंद्रनगर, आग्र्याचं अग्रवन, गाजीपूरचं गढीपुरी, देवबंदचं देववृंदपूर अशी नामांतर प्रस्तावित आहेत.

भाजप नेहमी शहरं किंवा रस्ते नामांतरावर आग्रही असल्याचा आरोप होतो. मात्र 2013 सालमधल्या एका आरटीआयनुसार सर्वाधिक नामकरणं काँग्रेस काळातच झालीयत.

रस्ते, विमानतळं, संस्था, मैदानं, दवाखाने असे मिळून जवळपास साडे 400 ठिकाणांना जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचं नाव दिलं गेलं.

सत्ताधारी असोत की मग विरोधक, नामांतरांच्या मुद्द्यााला निवडणुकांच्या तोंडावरच फोडणी दिली जाते. याआधी औरंगाबादचं नामांतर महाराष्ट्राच्या अनेक निवडणुकांसाठी पुरलं. आता अहमदनगरच्या नामांतराला पुन्हा पुणे शहराची जोड मिळालीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.