कथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी
बाणेर (पुणे) येथील तथाकथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ राजाराम येमुलने पुण्यातील एक उच्च शिक्षित पीडित महिलेसोबत जादुटोण्याचा प्रकार केलाय. त्यामुळे त्याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंनिसने केलीय.
पुणे : “बाणेर (पुणे) येथील तथाकथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ राजाराम येमुलने पुण्यातील एक उच्च शिक्षित पीडित महिलेसोबत जादुटोण्याचा प्रकार केलाय. या बाबाच्या सांगण्यावरुन पती आणि कुटुंबियांनी पीडित महिलेचा छळ केलाय. त्यामुळे तथाकथित गुरू आणि अन्य आरोपींविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शिवाजीनगर शाखेने केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने निवेदन जारी केलंय.
अंनिसच्या निवेदनात विशाल विमल यांनी म्हटलं, “पीडित महिलेला नवरा, सासू-सासरे, नंदन-त्यांचे पती आदींनी मानसिक, शारीरिक, लैंगिक त्रास, शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, आर्थिक पिळवणूक केल्यासंबंधी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हे प्रकरण बारकाईने पहाता कथित गुरूसह अन्य आरोपींवर जादूटोणा विरोधी कायद्यांतंर्गत गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे.”
VIDEO: कथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरुन पीडित महिलेवर जादुटोण्याचा प्रकार, अंनिसकडून आरोपीविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी@vishalvg87 @AvinashMANS @PuneCityPolice #Pune #ANIS pic.twitter.com/wAHNW0zbbt
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 12, 2021
“तुझी बायको अवदसा असून पांढऱ्या पायगुणाची”
“कथित गुरू रघुनाथ येमुल यांनी संबंधित महिलेच्या पतीला ”तुझी बायको अवदसा असून पांढऱ्या पायगुणाची आहे. तिची जन्म वेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान चुकीचे झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून तशीच राहिली तर तू आमदारही होणार नाहीस आणि मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून ताब्यात घे. तसेच मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पीडा कायमची निघून जाईल”, असं सांगितल्याची माहिती विशाल विमल यांनी दिलीय.
“पीडित महिला झोपलेल्या ठिकाणी हळदी कुंकू टाचण्या लिंबु आदींद्वारे जादूटोणा प्रकार”
विशाल विमल म्हणाले, “कथित गुरूंनी सांगितल्याने कुटुंबीय, नातेवाईक आदींनी पीडित महिला झोपलेल्या ठिकाणी हळदी कुंकू टाचण्या लिंबु आदींद्वारे जादूटोणा प्रकार केला. त्यामुळे पीडित महिलेच्या मनात भीती निर्माण करून त्रास देण्याचा प्रकार झाला. संबंधित महिलेला सिगारेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केलेली आहे. या महिलेबाबत ज्या गोष्टी घडल्या त्या जादूटोणा विरोधी कायद्यात गुन्हा म्हणून नमूद आहेत. त्यामुळे संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हावी.”
महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचे कार्यकर्ते विशाल विमल यांच्यासह महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे, संदीप कांबळे, प्रवीण खुंटे यांनी याबाबत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केलीय.
हेही वाचा :
“सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याला 4 वर्ष पूर्ण, सरकार अंमलबजावणी कधी करणार?”
मंत्री संजय राठोड प्रकरणात समाजाची ढाल पुढे करुन जात पंचायत सक्रिय, अंनिसचा गंभीर आरोप
राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचं वक्तव्य
व्हिडीओ पाहा :
ANIS demand FIR against Raghunath Yemul under Maharashtra anti superstition act