पुणेकर दहशतीत, तरुणांचा व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला, कारण वाचून बसेल धक्का
Pune Cirme News : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. या गँगमुळे आता व्यापारीसुद्धा दहशतीखाली आले आहे. दोन दिवसांत दुसऱ्यांदा व्यापाऱ्यावर हल्ला झाला आहे.
रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : पुणे शहर अन् परिसरात कोयता गँगचा धुमाकुळ सुरु आहे. या गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांकडून केले जाणारे प्रयत्न अपूर्ण पडत आहे. पुणे पोलीस कोयता गँगवर वचक ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. कोयात गँगचा बिमोड करण्यासाठी आतापर्यंत अनेकांना अटक केली गेली आहे. काही जणांवर मकोका लावण्याची कारवाई केली आहे. अनेक गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. मागील आठवड्यात कोम्बिंग ऑपरेशननंतर गुन्हेगार मोकाट सुटले असल्याचे दिसत आहे. कारण दोन दिवसांत दुसऱ्यांदा व्यापाऱ्यावर कोयताने हल्ला झाला आहे. यामुळे पुणेकर दहशतीत आले आहे
आता काय झाला प्रकार
पिंपरी- चिंचवड शहरातील रुपीनगर परिसरात दुकानदारावर कोयताने हल्ला झाला आहे. या भागात असलेल्या कपड्याच्या दुकानात काही तरुण खरेदीसाठी आले. व्यापाऱ्याने त्या तरुणांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यापाऱ्यांना राग आला. त्यांनी दुकानदारावर कोयत्याने हल्ला केला. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेच समोर आले आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
कोण आहेत आरोपी
व्यापाऱ्यावर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. चिखली पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपींची पोलिसांनी दहशत माजवलेल्या परिसरातून धिंड काढली आहे. परंतु धिंड काढून गुन्हेगारांमध्ये धाक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कोयते मिळतात तरी कोठून
पुणे शहरात कोयता हल्ला हा सामान्य प्रकार झाला आहे. गुन्हेगारांना कोयते मिळता तरी कोठून? हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. कारण पोलिसांनी कोयता घेण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. त्यानंतरही कोयत्याची सरार्स विक्री होत आहे.