धक्कादायक ! पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही तरुणांकडून तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण तरुणीने आरडाओरड केल्याने आरोपींनी तेथून पळ काढला आहे. त्यामुळे तरुणी बचावली आहे.

धक्कादायक ! पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 5:07 PM

Attack on Girl in pune : पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबधीत तरुणीने आरडाओरडा केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तरूणीने आरडाओरडा केल्याने हल्ला करण्यासाठी आलेले तरुण पळून गेले. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना आहे. पुण्यात यापूर्वी पेरूगेट पोलीस चौकीजवळील विद्यार्थिनीवर झालेल्या हल्याची पुनारवृत्ती टळली. एकतर्फी प्रेमातुन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

पुण्यात एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. काही महिन्यांआधी दर्शना पवार हत्या प्रकरणाने पुणे हादरले होते. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला होता. आता आज पुन्हा एका घटनेने मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न उपस्थित होत आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली आहे.

काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत देखील अशीच घटना घडली होती. जिथे एका तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला होता. तरुणी जीव मुठीत घेऊन पळत असतानाच खाली पडते. तो कोयत्याने वार करणारच त्यात तिथे एक तरुण धावत येतो आणि आरोपीच्या हातातून कोयता हिसकाऊन घेतो. अशा घटनांमध्ये अनेकदा लोकं बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे तरुणींचा जीव धोक्यात येतो.

एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. कॉलेजमध्ये या घटना अधिक दिसून येतात. प्रेमाला नकार दिल्याने मुले रागाच्या भरात मुलींवर हल्ला करतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.