Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचा ‘ऐकला चलो रे चा नारा’
महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला.
पुणे – महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने(Nationalist Congress party ) आपला सूर बदलला आहे. प्रशासनाने जाहीर केलेली प्रभाग रचना पाहता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा स्वबळावर जिंकू शकते. त्यामुळे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका अशी भूमीका पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठी समोर मांडणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (prashant Jagatap )यांनी पत्रकार परिषदेत घेत दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या( Pune Municipal Corporation) आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आज प्रकाशित झाला. काल (सोमवारी ) महापालिकेच्या संकेत स्थळावर चुकीने महापालिकेचा प्रभागांची नावे जाहीर झाल्यापासून शहरात राजकीय चर्चाना उधाण आले होते.
122 जागा जिंकण्याचा दावा महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा बहुप्रतिक्षित प्रारूप आराखडा महापालिका प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्षांनी व महापालिका सभागृहनेत्यांनी भाजप 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस किमान 122 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याच वेळी जगताप यांनी प्रशासनाने तयार केलेली प्रभाग रचना पाहता स्वबळावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेवर येऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी भूमिका आपण शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठीकडे मांडणार आहोत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आपणास मान्य असेल, असेही जगतात यांनी स्पष्ट यावेळी केले.
नागरिकांना देता येणार सूचना शहरातील 58 प्रभागांचे प्रारूप नकाशे आज (मंगळवार ) नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात आले असून, या प्रारूप नकाशावर नागरिकांना 14 फेब्रुवारीपर्यंत आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. महापालिकेच्या सावरकर भवन येथील निवडणुक कार्यालयात तसेच 15 क्षेत्रिय कार्यालयांमध्ये नागरिक आपल्या हरकती व सूचना दाखल करू शकणार आहेत. महापालिकेच्या विस्तारित इमारतीत तिसऱ्या मजल्यावर व सर्व क्षेत्रिय कार्यालयात त्या-त्या ठिकाणच्या प्रभागांचे नकाशे प्रसिध्द करण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही हे नकाशे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असल्याची माहितीही महानगरपालिकेने दिली आहे.
सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा, Nitesh Rane कोर्टातून रवाना
Nitesh Rane यांना कोर्टाचा मोठा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
मुंबईतील निर्बंध आणखी शिथील, रात्रीच संचारबंदी हटवली, नवे नियम काय?