वारी झाली हायटेक, वारी जाता आले नाही, मग घरी बसल्या असा घ्या वारीचा आनंद

Ashadhi Wari 2023 : यंदा वारी हायटेक झाली आहे. वारीचा आनंद घरी बसून घेता येणार आहे. यामुळे वारीला जाऊ न शकणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांना वारीचा आनंद मिळणार आहे. बदलत्या काळानुसार घरी बसून वारी पाहता येणार आहे.

वारी झाली हायटेक, वारी जाता आले नाही, मग घरी बसल्या असा घ्या वारीचा आनंद
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 12:47 PM

रणजित जाधव, पुणे : आषाढी महिना आला की वारीचे वेध वारकऱ्यांना लागते. मग हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी दिसतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची पालखी निघते तर आळंदीहून ज्ञानोबांची पालखी जाते. ‘माऊली माऊली, ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरी वारीत जात असतात. परंतु काही जणांनी जात येत नाही. त्यांनी आता निराश होण्याची गरज नाही. त्यांना घरीबसल्या वारी पाहता येणार आहे. आपली वारीसुद्ध आता हायटेक झालीय.

यंदा अशी असणार वारी

तुकोबा महाराजांची पालखी १० जून रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तसेच आळंदी येथून ११ जून रोजी ज्ञानोबांची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा झाला हायटेक झाला आहे. पालखी रथाला जीआरएस लावले गेले आहे. यामुळे आता संपूर्ण वारी सोहळा QR कोड स्कॅन करत पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

QR कोड करा स्कॅन

वारी हायटेक झाली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब, Linkdin याचा QR कोड स्कॅन केल्यावर संपूर्ण वारी सोहळा पाहाता येणार आहे. ज्या भाविकांना वारीमध्ये जाता येत नाही, त्या भाविकांसाठी ही सोय संत तुकाराम महाराज संस्थानकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Wari QU Code

राज्यभरातून शेतकरी वारीत

जून महिन्यात मान्सून सुरु होतो. परंतु राज्यभरातील शेतकरी शेतीची कामे पूर्ण करुन वारीत दाखल होत असतात. यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झालाय. त्यातील बहुतांशी वारकरी हे शेतीच करतात. हे शेतकरी आपल्या शेतातील मशागतीची काम पूर्ण करुन वारीला येतात.

वाहतुकीत केला बदल

संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी एकत्रित येणार आहे. पालखीच्या आगमनानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी घातली गेली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी १०० कर्मचारी राहणार तैनात करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामुले पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार आहे. पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप तसेच सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.