राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात, राज्यात सध्या असे दुर्दैवी चित्र : आशिष शेलार

राज्यासमोर अनेक प्रश्न आ-वाचून उभे आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात, असे चित्र राज्यात आहे," अशी खरमरीत टीका आशिष शेलार यांनी केली.

राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात, राज्यात सध्या असे दुर्दैवी चित्र : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 8:23 PM

पुणे : “शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, पाऊस, पुर, कोरोना, लॉकडाऊन, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण असे राज्यासमोर अनेक प्रश्न आ-वाचून उभे आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात, असे चित्र राज्यात आहे,” अशी खरमरीत टीका भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. ते आज (21 जुलै) पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी संघटनात्मक आढावा बैठका घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“स्वबळाची छमछम सोडली, तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही”

आशिष शेलार म्हणाले, “रोज सकाळ-संध्याकाळ तीन पक्षांमध्ये एकच चर्चा ती म्हणजे आम्ही “स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरे त्यावर अग्रलेख लिहिणार, मग तिसरे दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात. ही अशी सगळी स्वबळाची छमछम सोडली, तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही. हा दुसरे काही येत असेल तर लेडीज बारची छमछम ऐकू येते. हे मिडियानेच काल उघड केलं. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असून त्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही.”

“पुण्यात 50 हजार कोटींचे भूखंड या प्राधिकरणाकडे गेले कसे?”

“महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. मात्र मंत्री रोज सकाळी उठतात “सरकार 5 वर्षे टीकणार” हा जप पहिल्यांदा सर्व मंत्री 108 वेळा करतात, मग स्वबळ असे सारे दुर्दैवी चित्र आहे. पुण्यात भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 सुरू असून पुणे पीएमआरडीए करुन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सुरु आहे. 50 हजार कोटींचे भूखंड या प्राधिकरणाकडे गेले कसे? या समितीत भाजपचे आमदार का नाहीत? यातून एक मोठा घोटाळा केला जात आहे. आम्ही तेही योग्य वेळी ऊघड करु,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

हेही वाचा :

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही, आशिष शेलारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई पालिकेच्या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं, भरती नसताना मिठी नदीला पूर आला, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?; शेलारांची भीती

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar criticize MVA government over Dance Bar and dispute between alliance

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.