पुणे शहरात प्रेम प्रकरणातून युवक, युवतीवर हल्ला

Pune Crime News : पुणे शहरात प्रेम प्रकरणातून युवक अन् युवतीवर हल्ला झाला आहे. अगदी पोलीस चौकीसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात प्रेम प्रकरणातून युवक, युवतीवर हल्ला
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 11:27 AM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण प्रेम प्रकरणातून घडले होते. लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिचा मित्र राहुल हंडोरे यानेच तिचा खून केला होता. राहुल हंडोरे याला पोलिसांना अटक केली आहे अन् तो पोलीस कोठडीत आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणानंतर आता त्रिकोणी प्रेमाच्या प्रकारातून तरुण अन् तरुणीवर तिसऱ्या युवकाने हल्ला केला आहे. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात हे प्रेमीयुगल जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे.

काय आहे प्रकार

पुणे शहरात एका तरुणाकडून एक युवक अन् युवतीवर हल्ला झाला आहे. सदाशिव पेठेत कोयत्याने हा हल्ला झाला आहे. अगदी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात ते युवक अन् युवती जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल केले आहे. तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. आरोपीच्या चौकशीनंतर सर्व प्रकरण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान पुणे शहरात नुकतीच दर्शना पवार हिची हत्या झाली होती. एमपीएससीची वनअधिकारी परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. परंतु लग्नास नकार दिल्यामुळे तिचा मित्र  राहुल हंडोरे यांने राजगडावर नेऊन तिची हत्या केली. त्यानंतर राहुल फरार झाला होतो. आता पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. पुणे शहरात प्रेम प्रकरणातून होणाऱ्या या प्रकारांमुळे चिंता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.