CCTV Video: पुण्याच्या एटीएममध्ये ‘मुळशी पॅटर्नचा’ थरार, तलवारी, कोयत्याचा हल्ला सीसीटीव्हीत कैद

पुण्यात भेकराई नगरमध्ये वर्चस्व वादातून एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Attack on youth in ATM center at Pune Bhekrai nagar)

CCTV Video: पुण्याच्या एटीएममध्ये 'मुळशी पॅटर्नचा' थरार, तलवारी, कोयत्याचा हल्ला सीसीटीव्हीत कैद
Crime-News
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 5:28 PM

पुणे : पुण्यात भेकराई नगरमध्ये वर्चस्व वादातून एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रोहन काळूराम इंगळे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी रोहनवर हल्ला केला त्यावेळी रोहन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटला. सुदैवाने तो या हल्ल्यात बचावला. मात्र, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला (Attack on youth in ATM center at Pune Bhekrai nagar).

नेमकं प्रकरण काय?

रोहन इंगळे या तरुणाला नवा मोबाईल घ्यायचा होता. मात्र, त्याच्याजवळ पूरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा विचार केला. त्यानुसार तो बुधवारी (17 फेब्रुवारी) संध्याकाळी सहाच्या सुमारास भेकराई नगरमधील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढायला गेला. यावेळी त्याच्याविरोधातील एक टोळी त्याचा पाठलाग करत होती. तो एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या विरोधातील टोळी एटीएम सेंटरच्या बाहेर असलेल्या पान टपरीवर दबा धरुन बसली.

रोहनवर टोळीचा हल्ला

काही क्षण वाट पाहिल्यानंतर त्यांच्या टीमचा एक म्होरक्या एटीएम सेंटरमध्ये कोयता घेऊन आत शिरला. त्याच्यासोबत त्याचे इतर मित्रही हातात तलवार घेऊन बाहेर उभे होते. त्याने रोहनवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी रोहन बाहेर येऊन सैरावैरा पळू लागला. तो एटीएम सेंटरच्या बाहेर येताच पानटपरीवर दबा धरुन बसलेल्या टोळीनेदेखील शिविगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. यावेळी टोळीतील मुलांच्या हातात तलवारी होत्या. या हल्ल्यात रोहन गंभीर जखमी झाला.

चार जणांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रोहनवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे (Attack on youth in ATM center at Pune Bhekrai nagar).

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, तब्बल 22 आरोपी ताब्यात

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.