Pune crime : मारहाण करून समाधान झालं नाही म्हणून महिलेला लघवी पाजण्याचाही प्रयत्न; पुण्यातल्या सूसगावातला संतापजनक प्रकार
15 मे रोजी हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे फिर्यादी आणि त्यांचे सासरे तणावात होते. या धक्क्यातून सावरत 21 मेला फिर्यादी यांनी पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी चार महिलांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड : महिलेला लघवी (Urine) पाजण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना पिंपरीत घडली आहे. शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपींनी हा संताप आणणारा प्रकार केला शिवाय महिलेला मारहाणही (Beating) केली. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूसगाव याठिकाणी 15 मेरोजी हा प्रकार घडला. याविषयी पीडित महिलेने शनिवारी (21 मे) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फिर्याद दिली. आता या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. फिर्यादी महिला आपल्या सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली होती. त्यावेळी तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. यामुळे आरोपींना राग अनावर झाला. संतापाच्या भरात सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन
आरोपींनी केवळ मारहाणच केली नाहीत, तर महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे किळसवाणे वर्तनही केले. बाटलीमध्ये लघवी गोळा करून ती फिर्यादीस जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न केला. एका आरोपीने फिर्यादीस लाथाने मारहाण केली. एका आरोपीने फिर्यादी महिलेच्या डोक्यात काठी मारली तर एका आरोपीने बाटलीमध्ये स्वत:ची लघवी गोळा करून फिर्यादीस पाजण्याचा प्रयत्न करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तर त्यातील आणखी एका आरोपीने शिवीगाळ करून हातांनी मारहाण करून फिर्यादी आणि फिर्यादीचे सासरे यांना घरात डांबून ठेवले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना आरोपींनी घरात डांबून ठेवले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
धक्क्यातून सावरत पोलिसांत केली तक्रार
15 मे रोजी हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे फिर्यादी आणि त्यांचे सासरे तणावात होते. या धक्क्यातून सावरत 21 मेला फिर्यादी यांनी पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी पोलीस ठाण्यात आधी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार 354चा गुन्हाही दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी चार महिलांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत होते. मात्र आता महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे.