Photo Gallery | जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील “जाताय की राहताय…अजून किती टाळूवरच लोणी खाताय…” टोलनाक्यावरील बॅनर वेधतायत लक्ष
मावळमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाका परिसरात असलेल्या तळेगावातील जनसेवा विकास समितीकडून टोल हटावची बॅनरबाजी करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यशासनाची टोल वसुली कधीच संपली आहे. तळेगांव दाभाडे टोल नाक्यावर बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे.
"जाताय की राहताय... अजून किती टाळूवरच लोणी खाताय..." टोलनाक्यावरील बॅनर वेधतायत लक्षImage Credit source: TV9
Follow us
मावळमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाका परिसरात असलेल्या तळेगावातील जनसेवा विकास समितीकडून टोल हटावची बॅनरबाजी करण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्यशासनाची टोल वसुली कधीच संपली आहे.
तळेगांव दाभाडे टोल नाक्यावर बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे. त्याच्या विरोधात ही बॅनर बाजी करण्यात आली आहे.
“जाताय की राहताय… अजून किती टाळूवरच लोणी खाताय…” अशा आशयाचे बॅनर टोल नाक्या शेजारी लावल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केल्याप्रमाणे 60 किलोमीटरच्या आत संबंधित टोलनाका येतो. तिथे टोलची वसुली करू नये हा नियम आहे
मावळातील जनसेवा विकास समितीने हा टोलनाका बंद करण्याची मागणी केली आहे. तळेगांव दाभाडे टोल नाक्याच्या परिसरात जनसेवा विकास समिती कडून बॅनर बाजी करण्यात आली आहे