जिल्हाधिकाऱ्यांना रक्त देवून विरोध; पुण्यातील रिक्षा चालकांचं अनोखं आंदोलन

लॉकडाऊनमुळे धंदा बसल्याने कर्जबाजारी झालेले पुण्यातील रिक्षाचालक नैराश्येच्या गर्तेत सापडले आहेत. (Auto drivers to give blood in protest to dist collector in pune)

जिल्हाधिकाऱ्यांना रक्त देवून विरोध; पुण्यातील रिक्षा चालकांचं अनोखं आंदोलन
औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात.
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 5:29 PM

पुणे: लॉकडाऊनमुळे धंदा बसल्याने कर्जबाजारी झालेले पुण्यातील रिक्षाचालक नैराश्येच्या गर्तेत सापडले आहेत. सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यातच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी तगादा लावला आहे. हप्ते भरण्यासाठी धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे हताश झालेले पुण्यातील रिक्षाचालक आज जिल्हाधिकाऱ्यांना रक्त देऊन सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. (Auto drivers to give blood in protest to dist collector in pune)

लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचा धंदा बसला होता. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागलं. लॉकडाऊन असला तरी रिक्षाचालकांना रिक्षाचे हप्ते भरावे लागत होते. आधीच धंदा बसलेला त्यात रिक्षाचे हप्ते भरावे लागत असल्याने रिक्षाचालकांचं कंबरडं मोडलं आहे. सरकार आणि अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कर्जाच्या हप्त्यांमध्ये कोणतीच सवलत मिळाली नाही. ज्या कंपन्यांकडून रिक्षांसाठी कर्ज घेतलं आहे. त्या कंपन्या कधीही त्यांच्या कार्यालयात बोलावतात आणि झापतात. शिवीगाळ करून अपमानितही करतात. त्याकडे सरकारचं लक्ष नाही. कोरोनामुळे तर प्रवासी रिक्षात बसायलाही कचरत आहेत. त्यामुळे म्हणावा तसा धंदा होत नाही. परिणामी कर्जाचे हप्ते भरणं आणि घर चालवणं कठिण झालं आहे, असं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.

500 रिक्षाचालक रक्त देणार

आज सुमारे 500 रिक्षाचालक रक्ताच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. आमचं दिवसाचं उत्पन्न घटून 300 रुपये झालं आहे. त्यामुळे घर खर्च चालवणं कठिण झालं आहे. अशावेळी सरकारने काही नियमावली बनवली पाहिजे. किमान अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या नरमतील आणि आमच्या समस्या समजून घेतील, असं रिक्षाचालक संतोष नेवसकर यांना वाटतं. आमचा धंदा पूर्णपणे बसला आहे. सरकारकडूनही कोणतीच मदत मिळत नाही. कोणतीही खातरजमा न करता परमिट देण्याचं काम सुरू आहे. अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या त्यांच्या कार्यालयात बोलावून आम्हाला शिवीगाळ करतात आणि धमक्याही देत आहेत, असं दुसऱ्या एका रिक्षाचालकाने सांगितलं. (Auto drivers to give blood in protest to dist collector in pune)

संबंधित बातम्या:

Farmer Protest : 60 दिवस होऊनही केंद्राने याची दखल घेतलेली नाही : आदित्य ठाकरे

राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या ‘त्या’ प्रतिमेवरुन वादंग; सुभाषचंद्र बोसांऐवजी अभिनेत्याचे चित्र?

‘लाल वादळ’ राजभवानाच्या दिशेने, मोर्चेकऱ्यांना अडवलं; पोलिसांबरोबर आंदोलकांची झटापट

(Auto drivers to give blood in protest to dist collector in pune)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.