पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेचा नवा प्रयोग, एक्स्प्रेस गाड्यांचा वेळ वाचणार, काय आहे नवीन प्रणाली?
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून विविध प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करुन सुधारणा केल्या जात आहेत. आता एक्स्प्रेस गाड्यांचा वेळ वाचणार आहे.
पुणे | 22 ऑगस्ट 2023 : भारतीय रेल्वेकडून नवनवीन गाड्या सुरु केल्या जात आहेत. रेल्वेच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे वेळेची बचत शक्य होणार आहे. आता भारतीय रेल्वेने पुणे आणि लोणावळा दरम्यान नवीन प्रणाली बसवण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे एक्स्प्रेसच्या वेळेत बचत होणार आहे. सिग्नल बदलून दोन रेल्वेच्या वेळेत बचत करण्यात येणार आहे. एक्स्प्रेससाठी प्रथमच ही प्रणाली उपयोगात आणली जाणार आहे.
काय असणार प्रणाली
मध्य रेल्वेने लांब पल्याच्या ट्रेनसाठी सबर्बन नेटवर्क प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सिग्नल सिस्टीममध्ये बदल करण्यात येणार आहे. लांब पल्यांच्या गाड्यांसाठी 10 किमीचा लांबीवर दोन सिग्नल असणार आहे. दोन सिग्नल दरम्यान दुसरी ट्रेन आल्यास तिला थांबवले जाते. आता यावर काम सुरु केले आहे. यामुळे दोन ट्रेन दरम्यान अंतर कमी करणे, सिग्नल प्रणाली सुधारणे यावर काम केले जात आहेत.
काय आहे प्रणाली
दोन सिग्नलमधील लांबी ब्लॉक ऑटोमेटेड सिस्टीमने निश्चित केली जाते. यामुळे दोन सिग्नलचे अंतर 10 किमी असते. परंतु मुंबई सबर्बन नेटवर्कमध्ये हे अंतर फक्त 400 मीटर आहे. काही ठिकाणी डेमू किंवा मेमू ट्रेने सुरु आहेत, त्याठिकाणी 1 किमीपर्यंत हे अंतर आहे. या प्रणालीला ऑटोमँटेड ब्लॉक सिग्नलिंग म्हटले जाते. पुणे ते लोणावळा दरम्यान ही प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे.
किती झाले काम
पुणे-लोणावळा दरम्यान 60.59 किमी अंतर आहे. या ठिकाणी ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टम बसवली जात आहे. यामुळे 20 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेऊन हे काम केले गेले. सध्या चिंचवड-खडकी सेक्शनमध्ये 10.18 किमी ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 54 किमीवर काम पूर्ण झाले आहे. यामुळे एक्स्प्रेस गाड्यांचा वेळ वाचणार आहे.
मुंबई सबर्बन वगळता दिवा-पनवेल सेक्शनमध्ये ऑटोमॅटिक सिग्नल प्रणाली आहे. मुंबईत कल्याण, कसारा, कर्जत आणि सीएसएमटी यार्डमध्ये रीमॉडलिंगचे काम सुरु आहे. या दरम्यान सिग्नलिंग मॉर्डनाइजेशनचे काम केले जाते.