Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून अयोध्येसाठी १५ विशेष रेल्वे गाड्या, कसे असणार नियोजन

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची गर्दी वाढणार आहे. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी आता पुण्यातून अयोध्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. येत्या ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहे.

पुण्यातून अयोध्येसाठी १५ विशेष रेल्वे गाड्या, कसे असणार नियोजन
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 11:14 AM

योगेश बोरसे, पुणे, दि.18 जानेवारी 2024 | अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर नवीन मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी सुरु होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आता पुण्यातून अयोध्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. येत्या ३० जानेवारीपासून १५ विशेष रेल्वे गाड्या अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांची अयोध्या वारी सोपी होणार आहे.

पुणे शहरातून फेब्रवारी महिन्यात गाड्या

अयोध्याला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी राम भक्तांकडून केली जात होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने पुण्यातून ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत १५ विशेष रेल्वे अयोध्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका गाडीमध्ये साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकणार आहेत.

उद्धव ठाकरे अयोध्येत नाही नाशिकमध्ये घेणार राम दर्शन

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले आहे. परंतु उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार नाही. ते नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. त्यापूर्वी 21 जानेवारीला उद्धव ठाकरे शिवनेरी दौऱ्यावर जाणार आहेत. शिवनेरी गडावर जाऊन तिथली माती कलशात भरुन काळाराम मंदिरात घेऊन येणार आहे. 22 जानेवारीला काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे रामाची आरती करणार आहेत. तसेच गोदावरी काठी आरती करणार आहेत. यावेळी शिवनेरी गडावरची माती गोदावरीमध्ये सोडणार आहे. तसेच 23 जानेवारीला नाशिकमध्ये पदाधिकारी मेळावा घेणार आहे.

हे सुद्धा वाचा

“हर घर राम ” उपक्रम

जळगावातील जामनेर तालुक्यातील पहूर गावात घरा- घरावर “हर घर राम ” अशा आशयाच्या पत्रिका छापल्या जात आहेत. अयोध्या येथील राममंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पहूरमध्ये राम भक्तांमध्ये अनोखा उपक्रम सुरु केला आहे. घरा घरावर “हर घर राम” आशयाच्या पत्रिकेने संपूर्ण पहूर शहर राममय झाले आहे. 22 जानेवारीलाच पहूर गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान प्राचीन श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रारंभ करणार आहे.