राम मंदिरासाठी निमंत्रण, शरद पवार यांनी आभार मानले, पण खोचक उत्तर दिले

Ram Mandir : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्याला देशभरातून अनेक व्हिआयपी जाणार आहे. या सोहळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण आले आहे. त्याबद्दल आभार मानताना शरद पवार यांनी खोचक उत्तर दिले आहे.

राम मंदिरासाठी निमंत्रण, शरद पवार यांनी आभार मानले, पण खोचक उत्तर दिले
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 11:22 AM

अभिजित पोते, पुणे दि.17 जानेवारी 2024 | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या या सोहळ्याला इंडिया आघाडीचे नेते जाणार नाहीत. या सोहळ्यास महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप झाले होते. परंतु ट्रस्टकडून शरद पवार यांना निमंत्रण आले आहे. शरद पवार यांनी 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी आमंत्रण मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रस्टकडून आलेल्या आमंत्रणाबद्दल महासचिव चंपत राय यांचे शरद पवार यांनी आभार मानले आहे. यासंदर्भात पत्र देताना आभार मानताना खोचक उत्तरही दिले आहे.

काय म्हटले शरद पवार यांनी

भगवान राम भारतातीलच नाही तर जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. जगभरातील कोट्यवधी भक्तांची आस्था भगवान राम यांच्यासंदर्भात आहे. अयोध्यातील समारंभासंदर्भात राम भक्तांमध्ये उत्सुकता आहे. यामुळे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत येत आहेत. त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक समारंभाचा आनंद माझ्यापर्यंत पोहचणार आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्त येणार असल्यामुळे 22 जानेवारीच्या नंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आपण येणार आहोत. माझे अयोध्येला येणे नियोजित आहे. मी अयोध्येत दर्शनासाठी येईल तोपर्यंत राम मंदिराचे काम देखील पूर्ण झाले असेल असाही पत्रात उल्लेख आहे.

पत्रातून पवारांनी अपूर्ण कामावर ठेवले बोट

शरद पवार यांनी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र पाठवले. त्यात आभार मानत असताना काम अपूर्ण असल्याची जाणीव करुन दिली. यामुळे शरद पवार यांच्या या पत्राची चर्चा होत आहे. एकीकडे देशातील नागरिकांचे लक्ष अयोध्येतील सोहळ्याकडे लागले असताना विरोधकांकडून उणीवा दाखवल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कामांचे वाटप करण्यात आले आहे. रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेकडून देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवले आहेत. महाराष्ट्रातून सत्ताधारी व्हिआयपीसोबत विरोधका व्हिआयपीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही निमंत्रण दिले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनाही बोलवण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.