‘ही दहशत थांबली पाहिजे’, 95 वर्षीय बाबा आढाव आक्रमक, विश्वजीत कदम यांच्या भेटीनंतर म्हणाले…

"1952 पासून निवडणुका पाहत आलो आहे. पण या निवडणुकीत जो प्रकार घडला आहे तसं कधी घडले नाही. पैशांचा धुमाकूळ घातला. भाऊ म्हणून शासकीय तिजोरीतून पैसा वाटला. या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठा वापर झाला. हे जर फसवत असताना मी गप्प बसलो तर मी कसला कार्यकर्ता?", असं बाबा आढाव म्हणाले.

'ही दहशत थांबली पाहिजे', 95 वर्षीय बाबा आढाव आक्रमक, विश्वजीत कदम यांच्या भेटीनंतर म्हणाले...
95 वर्षीय बाबा आढाव आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 9:53 PM

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं वयाच्या 95 व्या वर्षी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी बाबा आढाव यांच्या उपोषस्थळी जात भेट घेतली. यावेळी बाबा आढाव आणि विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “1952 पासून निवडणुका पाहत आलो आहे. पण या निवडणुकीत जो प्रकार घडला आहे तसं कधी घडले नाही. पैशांचा धुमाकूळ घातला. भाऊ म्हणून शासकीय तिजोरीतून पैसा वाटला. या निवडणुकीमध्ये पैशांचा मोठा वापर झाला. हे जर फसवत असताना मी गप्प बसलो तर मी कसला कार्यकर्ता? या निवडणुकीमध्ये मनमानी पद्धतीने पैशांची उधळपट्टी केली. पंतप्रधानांनी आदानींना पाठिंबा जाहीर केला. माजलेले भांडवलदार ठरवत आहेत की, या देशामध्ये कोणाची सत्ता असावी. लोकसभेला एक निकाल आणि विधानसभेला वेगळा निकाल हा चमत्कार कसाकाय घडला? स्वतःच्या खिशातून भाऊबीज साजरी करण्यापेक्षा सरकारी तिजोरीतून भाऊबीज साजरी केली. ही दहशत थांबली पाहिजे त्यासाठी आपण लढलं पाहिजे”, असं बाबा आढाव म्हणाले.

विश्वजीत कदम काय म्हणाले?

“बाबा आढाव जे उपोषण करत आहेत ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकशाहीची ही लढाई आहे. सध्याची निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्यात पारदर्शकता नाही. यामध्ये लोकशाहीला कमकुवत केलं जात आहे. एका वेगळ्या दिशेला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुकीला नेलं जात आहे. ईव्हीएमबाबत महाराष्ट्राची जनता शंका उपस्थित करत आहे. जिंकलेल्या उमेदवाराला सुद्धा विश्वास बसत नाही की, आम्ही एवढ्या मताधिक्याने कसं काय निवडून आलो. लोकशाहीची निवडणूक पारदर्शक करायची असेल तर बॅलेट पेपरवरती येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे. तरंच महाराष्ट्रात लोकशाही टिकेल”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“जी जनता सहा महिन्यापूर्वी महायुतीच्या सरकारवर राग व्यक्त करते, या सहा महिन्यात नक्की असा काय चमत्कार घडला की महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या विरोधात जाते? या निकालामध्ये गडबड आहे. यामुळे आमची मागणी आहे निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.