AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पुण्यातला बाबा भिडे पूल बंद, मुसळधार पावसामुळे पाणीपातळी वाढली; पोलीस बंदोबस्तही करण्यात आला तैनात

मध्यरात्रीपासून खडकवासला धरणातून 2,568 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. तर संपूर्ण आठवडाभर पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला आहे.

Pune rain : पुण्यातला बाबा भिडे पूल बंद, मुसळधार पावसामुळे पाणीपातळी वाढली; पोलीस बंदोबस्तही करण्यात आला तैनात
बाबा भिडे पुलालगत वाहत असलेले पाणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 7:09 PM

पुणे : पुण्यातील बाबा भिडे पुलावरील (Baba Bhide Bridge) वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडेपुलाला लागून पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla dam) दुपारी एक वाजता 11 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून हे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. दर पावसाळ्यात भिडे पूल पाण्याखाली जातो. आता मागील पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदी पात्राला लागून असणारी वाहने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला काढली जात आहेत. दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुठा नदीच्या (Mutha river) वरच्या भागातील धरणांमध्ये 10.79 टीएमसी पाणीसाठा वाढल्याने, नदीच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणांतला पाणीसाठा

मागील 24 तासांत पानशेतमध्ये 141 मिमी पाऊस झाला असून वरसगावमध्ये 137 मिमी, टेमघरमध्ये 170 मिमी आणि खडकवासला धरणात 60 मिमी पाऊस झाला आहे. चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या या मुसळधार पावसामुळे या धरणांमध्ये 2 टीएमसीने पाण्याची आवक वाढली आहे. मध्यरात्रीपासून खडकवासला धरणातून 2,568 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. तर संपूर्ण आठवडाभर पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

लोणावळा धरणक्षेत्रातही पाऊस

पिंपरी चिंचवड परिसरातही जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत आहे. लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील 48 तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. लोणावळा धरणात जलाशय पातळी 623.98 मीटर झाली असून पाणीसाठा 7.11 द.ल.घ.मी. (60.74 टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बाबा भिडे पुलालगत वाहत असलेले पाणी

पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.