Pune News | पुण्यात ठरले, आता डीजे अन् लेझरमुक्त करणारा हा सर्वात मोठा उत्सव, कोणी घेतला निर्णय?

Pune dr babasaheb ambedkar jayanti | पुणे शहरात आता लेझरमुक्त उत्सव करण्यासाठी पावले उचलली आहे. या उत्सवात डीजे नसणार आहे. तसेच पुणे शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी पावले उचलली गेली आहे. शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.

Pune News | पुण्यात ठरले, आता डीजे अन् लेझरमुक्त करणारा हा सर्वात मोठा उत्सव, कोणी घेतला निर्णय?
laser light in ganesh visarjan
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 4:20 PM

अभिजित पोते, पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात गणेश उत्सवात लेझरचा वापर करण्यात आला होता. त्याचे परिणाम अनेकांच्या डोळ्यांवर झाल्याचे आता समोर येऊ लागले आहे. तसेच शहरातील महत्वाच्या भागात गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीत आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा डबल होती. गणेश मंडळांनी लावलेल्या डीजेमुळे आवाज वाढला होता. या सर्वांचा त्रास त्या भागातील रहिवाशांना झाला तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर अनेक कार्यकर्ते डोळे आणि कानाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे गेले. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी शुक्रवारी पावले उचलली गेली.

कोणता उत्सव होणार डीजे मुक्त

पुणे शहरात डीजे आणि लेझरमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार शुक्रवारी आंबेडकरी जनतेने केला. तसेच पुणे शहरासह राज्यातील विविध शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती डीजे आणि लेझरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात येणार आहे. पुणे शहरातील संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

विविध मंडळांना देणार भेटी

पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन आंबेडकर जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये, असे मतपरिवर्तन करण्यात येणार आहे. पुणे शहर डॉल्बीमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित चर्चासत्रात हा निर्णय घेण्यात आला. लेझर आणि डीजेचे होणाऱ्या दुष्परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आला. आंबेडकरी जनतेने घेतलेल्या या निर्णयाचे पुणेकरांकडून स्वागत करण्यात येत आहे.

लेझर असतात धोकादायक

गणेश विसर्जन मिरवणुकीत हिरव्या लेझर लाईटचा वापर केला गेला. या लेझरची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेणाऱ्या अनेक तरुणांना नेत्ररोग तज्ज्ञाकडे धाव घ्यावी लागली. यामुळे लेझर लाईट विरोधात सामजिक संस्थांकडून आवाज उठवला जात आहेत. या लेझर वापरावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.