Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही…जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान

manoj jarange patil | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला. यानंतर सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना खुले आव्हान दिले आहे.

मनोज जरांगेची औकात नाही, लायकी नाही...जरांगे यांना आता कोणाकडून आव्हान
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 1:53 PM

विनय जगताप, पुणे दि.28 जानेवारी 2024 | मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी प्रचंड संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. मनोज जरांगे यांची औकात नाही, लायकी नाही… औकात असेल तर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्या. त्यासाठी जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावे, अशी आव्हान लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिले. मराठा आंदोलनामुळे एका रात्रीत काढलेल्या अध्यादेशावर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड टीका केली आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजीएनटी समाज प्रचंड नाराज झाला आहे. आम्हाला डावलल जात आहे. बेदखल केले जात आहे. हाच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे का? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मिंधे सरकारची किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्रीची ही औकात आहे का?

शिवाजी महाराजांचे नाव घेता…

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील रयत अशी अपेक्षित होती का? छत्रपतींचे उटसूट नाव घेता आणि ओबीसी समाजातील माणसांच्या न्यायहक्कांच्या विरोधात मुख्यमंत्री रात्री, अपरात्री अध्यादेश काढतात. राज्यातील ओबीसी समाजातील लोकांना हे अजिबात आवडलेले नाही. मनोज जरांगे यांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची रयत समजून घ्येयाची असेल, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्यायचे असेल, तर चर्चेला या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला आम्ही तयार आहोत.

हे सुद्धा वाचा

तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित देईल. आता महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा एल्गार पुकारणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली असताना लक्ष्मण हाके समोर आले आहे.

हे ही वाचा…

मराठा समाजासाठी 2011 पासून आंदोलन, अखेर 2024 मध्ये यश, मनोज जरांगे 14 वर्षांचा वनवास संपला

लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.