बंदी असतानाही पुरंदरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन, 10 बैलगाड्यांसोबत 12 दुचाक्या जप्त

पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाड्या तसेच बारा दुचाक्या जप्त केल्या आहेत.

बंदी असतानाही पुरंदरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन, 10 बैलगाड्यांसोबत 12 दुचाक्या जप्त
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 11:30 PM

पुणे : पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे तसेच बारा दुचाक्या जप्त केल्या आहेत. या प्रकारानंतर जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली असून आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. (Bailgada Sharyat organised in Purandar Pune police file case against organisers)

मिळालेल्या माहितीनुसार थोपटेवाडी येथील बोलाईदेवीच्या पायथ्यालागत असलेल्या माळरानावर बैलगाडा शर्यत सुरु होती. याविषयीची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना मिळाली. आपल्या गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास गोतपागर हे माळरानार गेले. त्यानंतर या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू असल्याचे त्यांना आढळून आले.

त्यानंतर बैलगाड्यांच्या शयर्तीदरम्यान पोलीस दाखल झाल्याचे समजताच स्पर्धक आणि प्रेक्षकांनी बैलांना तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणाहून दहा बैलगाडे तसेच 12 दुचाक्या जप्त केल्या. हे सर्व बैलगाडे आणि दुचाक्या सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पाहा व्हिडीओ :

हा प्रकार समोर येताच पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. तसेच आयोजकाबरोबरच जागेच्या मालकाचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

इतर बातम्या :

लॉकडाऊनचे नियम धुडकावले, हजारोंच्या संख्येने गर्दी जमवून बैल गाडी शर्यत

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.