VIDEO : पठ्ठ्याला बैलगाडा शर्यतीचा नाद, लग्नातही उखाणा घेताना भिर्रर्रर्र…..हुर्रर्रची साद

बाजीराव टेमकरांनी भिर्रर्र... र्रर्र.. करत घाटातील शर्यतीच्या स्टाईलने पत्नीचं नाव घेतलं. bullock cart race announcement

VIDEO : पठ्ठ्याला बैलगाडा शर्यतीचा नाद, लग्नातही उखाणा घेताना भिर्रर्रर्र.....हुर्रर्रची साद
बाजीराव टेमकर यांनी लग्नात उखाण्याऐवजी बैलगाडा शर्यतीच्या घोषणेच्या रुपात नाव घेतलं
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 11:18 PM

पुणे: राज्यात मागील सात वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम आहे. बैलगाडा शर्यतीवर(Bullock Cart Race) बंदी असली तरी बैलगाडा प्रेमींची बैलगाड्यांची हौस व बैलांवरील प्रेम कणभरही कमी झालं नसल्याचं राज्यात नेहमी पाहायला मिळतं. पुण्यातील अशाच बैलगाडा प्रेमीने स्वतःच्या लग्नात पत्नीचे नाव घेताना उखाण्या ऐवजी घाटात बैलगाडा पुकारतात अशा स्टाईलने पत्नीच्या नावाचा उखाणा घेतला. नवऱ्यामुलांनं अनोख्या प्रकारे उखाणा घेतल्यानं वऱ्हाडी मंडळींना बैलगाडा घाट भरल्याचा अनुभव आला. (Bajirao Temkar take wife name in bullock cart race announcement style)

पत्नीच्या नावाच्या ऊखाण्यात बैलगाडा शर्यत

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकच्या बाजीराव टेमकर आणि निशा यांचा विवाह सोहळा शनिवारी पार पडला. लग्न म्हटल्यावर बाजीराव टेमकर(Bajirao Temkar) यांच्या मित्रांनी त्यांना पत्नीच्या नावाचा उखाणा घेण्याचा आग्रह केला. मात्र, यावेळी त्यांनी बाजीराव टमेकर यांना शर्यतीच्या घाटातील स्टाईल प्रमाणं नाव घेण्यास सांगतिलं. मित्रांच्या आग्रहाचा मान राखण्यासाठी नवरेदव असलेल्या बाजीरावांनीही अगदी सहजपणे भिर्रर्र… र्रर्र.. करत घाटातील शर्यतीच्या स्टाईलने पत्नीचं नाव घेऊन उपस्थितांची मने जिंकली. बाजीराव टेमकर यांच्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या प्रकारे पत्नीचं नाव घेतलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

बैलगाडा शर्यतीच्या स्टाईलमध्ये पत्नीचं नाव

बैलगाडा शर्यती शेतकऱ्यांचा छंद

बाजीराव टेमकर यांनी मित्रांचा आग्रह असल्यामुळं शर्यतीच्या घोषणेच्या स्टाईलनं पत्नीचं नाव घेतल्याचं सांगितले. आमच्या घरात पहिल्यापासून बैलगाडा शर्यतीची परंपरा असल्यानं नाव घेताना कसलीही अडचण आली नाही. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जूना छंद आहे. पुढील काळात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात, असं बाजीराव टेमकर यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत गाजला बैलगाडा शर्यतीचा मुद्दा

बैलगाडा शर्यतीचा मुद्दा 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गाजला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमदेवार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी आणला होता. विधानसभा निवडणुकीतही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीवरील बंदीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात समोर आलेला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील बैलगाडा प्रेमींनी राज्यातील राजकारण्यांनी बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी भूमिका यापूर्वी अनेकदा घेतली आहे.

संबंधित बातम्या:

काश्मिरची कली साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा

तर सातारची सून झालेल्या काश्मीरच्या कन्येचा प्रॉपर्टीवरचा हक्क अबाधित राहणार?

(Bajirao Temkar take wife name in bullock cart race announcement style)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.