प्रशासनानं वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, बंडातात्या कराडकर यांच्याकडून देहूच्या वेशीवरील आंदोलन स्थगित

शासनाला आपल्याला वेठीस धरायचे नाही,त्यामुळे आपलं भजन सत्याग्रह आंदोलन थांबवण्यात येत आहे, बंडातात्या कराडकर म्हणाले. Bandatatya Karadkar agitation Dehugaon

प्रशासनानं वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, बंडातात्या कराडकर यांच्याकडून देहूच्या वेशीवरील आंदोलन स्थगित
बंडातात्या कराडकर, ज्येष्ट किर्तनकार
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 6:54 PM

पुणे: संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर हे देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन करत होते. त्यांनी शासनाला वेठीस धरायचं नाही, असं म्हणत आंदोलन थांबवलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देहू गावाला चहू बाजूंनी नाकेबंदी करत चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देहूगाव परिसरात संचारबंदी ही लागू करण्यात आली असल्यानं गावाबाहेरील एका ही व्यक्तीला गावामध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Bandatatya Karadkar stop his agitation for entry in Dehugaon)

बंडातात्या कराडकर यांच्याकडून राज्य सरकारवर टीकास्त्र

शासनाला आपल्याला वेठीस धरायचे नाही,त्यामुळे आपलं भजन सत्याग्रह आंदोलन थांबवण्यात येत आहे. प्रशासने वारकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. नांदेडमधील गुरुद्वारा हा एक दिवस पण बंद नव्हता कारण त्याच्यामध्ये एकी होती. देहू मधील गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समजावून सांगितलं पाहिजे होते. वारकरी धर्म हा मानवता धर्म पाळतो. दारुची दुकाने चालू आणि त्यांच्याकडून हप्ते घेणार हे कुठल्या मानवता धर्मात बसत, असा सवाल कराडकर यांनी केला.

आषाढी वारी पायी होणार का नाही याचं उत्तर द्यावं?

सध्या राज्यात 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा मुद्दा चर्चेत आहे कुठल्या मानवता धर्मात बसतो याचं उत्तर पालकमंत्री अजित पवार यांनी द्यावं, असं आव्हान बंडातात्या कराडकर यांनी दिलं. येणारी आषाढी वारी पायी होणार का नाही याचं उत्तर द्यावं?, असंही ते म्हणाले. आंदोलन मागे घेण्यापूर्वी देहूच्या वेशीवर बंडातात्या कराडकर यांनी शेकडो वारकाऱ्यांसह भजन सत्याग्रह केला. बीज सोहळ्याच्या निमित्त नुकतंच त्यांनी वारकऱ्यांनी देहूला यावं, असं आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून वारकरी देहूच्या वेशीवर आले होते.

देहूमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून केवळ 50 जणांच्या उपस्थितीमध्ये बीज सोहळा पार पडणार आहे. देहू आणि आळंदी संस्थाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे बीज सोहळा पार पडेल अशी भूमिका घेतली होती. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या प्रकरणात लक्ष घातलं असून बंडातात्या कराडकर एक दोघांसह आले तर त्यांचं स्वागत करू, असे म्हटले होते. कायदा मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

संबंधित बातम्या:

Pune Corona Update : पुण्यात कोरोनाचा कहर, प्रमुख रुग्णालयांमध्ये मात्र बेड्सची कमतरता!

डेक्कनच्या सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर, गॅस गळतीच्या भीतीने परिसरात खळबळ

(Bandatatya Karadkar stop his agitation for entry in Dehugaon)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.