pune crime | बांगलादेशी तरुणींना त्वचेवर उपचार करण्याचे आमिष दाखवून पुणे शहरात बोलवले, शेवटी…

pune crime | पुणे शहरात बांगलादेशातून काही तरुणींना बोलवण्यात आले. त्या तरुणींनी त्वचेवर उपचार करण्याचे आमिष संबंधितांकडून दाखवण्यात आले. विमानाने त्या तरुणी बांगलादेशातून पुण्यात आल्या. त्यानंतर त्यांना...

pune crime | बांगलादेशी तरुणींना त्वचेवर उपचार करण्याचे आमिष दाखवून पुणे शहरात बोलवले, शेवटी...
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 1:11 PM

पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात एक वेगळाच प्रकार उघड झाला आहे. पुणे येथील बुधवार पेठेतून हा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या छापेमारीत हा प्रकार समजला आहे. पुण्यात बांगलादेशातून काही तरुणींना बोलवण्यात आले होते. त्या तरुणींना त्यांच्या त्वचेवर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मग त्या विमानाने पुणे शहरात आल्या. परंतु त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही घडले ते सामाजिक सुरक्षा विभागाने उघड केले. या प्रकरणी सात जणांना अटक झाली आहे.

काय आहे नेमका प्रकार

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. या विभागाने बुधवार पेठेत सात बांगलादेशी महिलांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती उघड झाली ती धक्कादायक आहे. या तरुणींची फेसबुकवर ओळख झाली होती. मग त्या लोकांना तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर भारतात चांगली ट्रिटमेंट होईल. तुम्ही पुण्यात या…असे सांगितले. त्यानंतर त्या तरुणी विमानाने कोणतीही कागदपत्रे नसताना पुण्यात आल्या. परंतु त्यांना कुंटणखान्यात बसवण्यात आले.

महिन्याभरात तिसरी कारवाई

पुणे पोलिसांनी गेल्या महिन्याभरात ही तिसरी कारवाई केली आहे. पुणे हा बांगलादेशी महिलांचा अड्डा बनला आहे. बुधवार पेठेतील कुंटणखान्यात त्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे पुणे येथील बुधवार पेठेत राहणाऱ्यांवर पोलिसांची नजर असते. आता सलग तिसऱ्यांदा बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या वेळी सात जणांना अटक केली. त्या बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्रे नव्हती.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात बांगलादेशी वाढले

पुणे शहरात बांगलादेशी नागरिक वाढले आहेत. पोलिसांकडून बांगलादेशी घुसखोरांवर अधुनमधून कारवाई होते. परंतु या कारवाईत सातत्य नाही. त्यामुळे बांगलादेशी नागरिक बिनधास्तपणे घुसखोरी करतात. पुणे पोलिसांनी ही कारवाई सातत्याने केल्यास घुसखोरांवर प्रतिबंध बसणार आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरात घुसखोरांविरोधात मोहीम सुरु केली तर अनेक घुसखोर सापडणार आहे. काही जण बनावट कागदपत्रे तयार करुन राहत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.