वयाच्या 66 व्या वर्षी केला विक्रम, पोहणे, धावणे, सायकल चालवण्यात केली विक्रमी कामगिरी
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील सुपुत्र आणि पुण्यातील उद्योजक दशरथ दिनकर जाधव यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अल्ट्रामॅन ही अत्यंत खडतर स्पर्धा पुर्ण केली.
नविद पठाण, बारामती : आवड आणि ध्येय ठरवले की कोणत्याही क्षेत्रात वय आडवे येत नाही. नातवांसोबत खेळण्याच्या वयात अनोखी कामगिरी करता येते. बारामतीमधील उद्योजकाने (baramati businessman) वयाच्या ६६ वर्षी सर्वात अवघड समजली जाणारी अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण केली. वयाच्या 66 व्या वर्षी अल्ट्रामॅन ही अत्यंत खडतर स्पर्धा जिंकून भारतातील या वयातील पहिली व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. यापुर्वी एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (milind soman) यांनी ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे या स्पर्धेचे नाव सर्वापर्यंत पोहचले होते.
वयाच्या ६६ व्या वर्षी अल्ट्रामॅन ही अत्यंत खडतर स्पर्धा पुर्ण करण्याची कामगिरी बारामतीचे उद्योजक दशरथ दिनकर जाधव यांनी केली. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील सुपुत्र आणि पुण्यातील उद्योजक दशरथ दिनकर जाधव यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अल्ट्रामॅन ही अत्यंत खडतर स्पर्धा पुर्ण केली. अल्ट्रामॅन स्पर्धा पुर्ण करणारे ते भारतातील पहिली व्यक्ती ठरले आहे. त्यांनी आतापर्यंत आयर्नमॅन ही स्पर्धा दहा वेळा पूर्ण केली आहे.
आयर्नमॅनचा पुढचा टप्पा अल्ट्रमॅन
आयर्नमॅन स्पर्धा केवळ १२ तासांत पुर्ण केल्यानंतर अल्ट्रमॅनसाठी संधी मिळते. अल्ट्रामॅन या ३ दिवसांच्या स्पर्धेत पहिल्या दिवशी १० किलोमीटर चालावे लागते. त्यानंतर स्विमींग आणि १४५ किलोमीटर सायकलिंग करावी लागेत. दुसऱ्या दिवशी २८० किमी सायकलिंग अशी एकूण ४२५ किलोमीटर सायकलिंग होते. तिसऱ्या दिवशी ८५ किलोमीटर रनिंग करावयाचे असते. हे सर्व टप्पे दशरथ जाधव यांनी पुर्ण केले. त्यामुळे त्यांच्या नावावर देशातील विक्रम नोंदवला गेला.
अशी असते ही स्पर्धा
१० किलोमीटर पोहणे, ८४ किमीटर धावणे व ४२३ किलोमीटर सायकल चालवणे असा स्पर्धेचा क्रम असतो. दशरथ जाधव यांनी हे अंतर ३४ तास ५१ मिनिटांत पूर्ण केले आहे. दिलेल्या वेळेत हे अंतर त्यांनी पूर्ण केले आणि आपण ‘अल्ट्रामॅन’ असल्याचं सिद्ध केलं आहे.
मिलिंद सोमण यांनी पुर्ण केली होती स्पर्धा
मिलिंद सोमणसोबत अभिषेक मिश्रा, कौस्तुभ राडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमढ रेब्बा यांनी अल्ट्रामॅरेथॉन यशस्वीरित्या पार केली आहे.