Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामती हा बिबटचा विषय होऊ शकत नाही ; जे आमचं आहे त्याच्यावर आतिक्रमण करू नका – माजी आमदार शरद सोनवणे

या तालुक्यात बिबट्यांची संख्याही लक्षणीय होती अन आताही आहे. उसाच्या फडात बिबट्यांची पिल्ले सापडल्यानंतरही त्या पिल्लांना वन विभागाच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.त्यामुळे बिबट ही जुन्नर तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे बिबट सफारी जुन्नर तालुक्यात व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून 2015 पासून होत आहे.

बारामती हा बिबटचा विषय होऊ शकत नाही ; जे आमचं आहे त्याच्यावर आतिक्रमण करू नका - माजी आमदार शरद सोनवणे
प्रतिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 2:41 PM

जयवंत शिरतर , जुन्नर- ऐतिहासिक दृष्टया महत्त्वपूर्ण तालुका म्हणून जुन्नर(Junnar) ओळखला जातो. मात्र याच तालुक्यात आता बिबटयावरून(leopard) चांगलेच राजकारण पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये बिबट सफारीचा पायलट प्रोजेक्ट बारामतीला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेते तसेच स्थानिक नागरिकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आहे. ज्या तालुक्याने गेल्या कित्येक वर्षांपासून बिबट्या  आणि माणसांमध्ये संघर्ष होत आला आहे. अनेकदा वन विभागाच्या (Forest Department) मदतीने हा संघर्ष मिटवण्यात आला. या तालुक्यात बिबट्यांची संख्याही लक्षणीय होती अन आताही आहे. उसाच्या फडात बिबट्यांची पिल्ले सापडल्यानंतरही त्या पिल्लांना वन विभागाच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.त्यामुळे बिबट ही जुन्नर तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे बिबट सफारी जुन्नर तालुक्यात व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून 2015 पासून होत आहे.

धोरणात्मक निर्णयाची आवश्यकता

बिबट्या च्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे होते. ही भूमिका लक्षात ठेऊन तत्कालीन काळात बिबट सफारीचा प्रकल्प आधिवेशनात मांडला होता. आंबेगाव येथे याबाबत पाहणी झाली होती.हा सर्व पत्रव्यवहार पटलावर असताना देखील , जुन्नरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी याबाबत कुठल्याही प्रकारची ही बिबट सफारी होण्यासाठी कारवाई केली नाही .हे मोठे या जुन्नर तालुक्याचे शल्य आहे. हा बिबट प्रकल्प येथून गेला तर तालुक्याची अस्मिता आणी उर्जा संपुष्टात येईल. याबाबत उपमुख्य मंत्री अजित दादाना पत्रव्यवहार केला आहे.

आमच्या आहे त्यावर अतिक्रमण नको

“बारामती हा बिबटचा विषय होऊ शकत नाही .तसेच शिवसृष्टी देखील बारामतीचा विषय होऊ शकत नाही.त्यामुळे हे कारण नसताना आमच्यावर लादल जातय.उपमुख्यमंत्री साहेब..जे तुमच्याकडे आहे त्याची ताकद समाजापुढे आहे.मात्र जे आमच आहे त्याच्यावर आतिक्रमण करू नका असा इशारा जुन्नरचे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यानी दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील बिबट सफारीचे राजकारण नक्कीच रंगणार यात तिळमात्र शंका नाही.

Maratha बांधवांचा 23 मार्चला ‘खंजीर दिवस’, Sharad Pawar, Chandrakant Patil यांच्या घराबाहेर करणार आंदोलन

खेडमध्ये महिलेची सरपंच पदावर निवड होताच ; गुलाल उधळत अन जेसीबीतून काढली मिरवणूक

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.