बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही… अजित पवार यांनी प्रचारात सांगितला…
ajit pawar sunetra pawar: खडकवासला गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. याबाबत तोडगा काढायचा आहे. हा तोडगा केव्हा निघेल जेव्हा या मतदार संघातील खासदार संरक्षण मंत्र्यांना भेटले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. प्रचार सभा, रोड शो सुरु आहेत. कार्यकर्ते अन् नेते रात्रंदिवस एक करत आहेत. राज्यात सर्वाधिक चर्चा बारामती लोकसभा मतदार संघासंदर्भात होत आहे. या ठिकाणी पवार कुटुंबात लढत होत आहे. शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले आहेत. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिले आहे. नणंद-भावजयमधील या लढतीची चर्चा होत आहे. आता प्रचारात बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांना विजयी केल्यामुळे मला त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम करावे लागणार आहे, अन्यथा माझे काही खरं नाही, असे मिश्कील वक्तव्य अजित पवार यांनी केले.
खडकवासला मतदार संघात भेटीगाठी
अजित पवार मंगळवारी रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात होते. बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी त्यांनी घेतल्या. ते म्हणाले, खडकवासला गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. याबाबत तोडगा काढायचा आहे. हा तोडगा केव्हा निघेल जेव्हा या मतदार संघातील खासदार संरक्षण मंत्र्यांना भेटले.
यामुळे आता तुम्ही घड्याळ मतदान करा, म्हणजे आपोआप तुमचा खासदार हा प्रश्न सोडवणार आहे. मागील निवडणुकीत तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच या ठिकाणी काहीच चालत नाही, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
मला ते काम करावेच लागणार
सुनेत्रा पवार खासदार झाल्याचा तुम्हाला फायदा आहे. त्यांच्या माध्यमातून माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकारचा निधी असणार आहे. ही सर्व माझी पण जबाबदारी आहे. उद्या बायकोने घरी म्हटले, हे काम करुन द्या, तर मला ते करुन द्यावेच लागणार आहे. नाहीतर माझे काही खरे नाही, अजित पवार यांच्या या मिश्कील वक्तव्यानंतर चांगलेच हास्य पसरले होते.