बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा, नणंद भावजयचे प्रचार रथ अन्…

supriya sule sunetra pawar | पवार कुटुंबियांचा विकास रथ आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील फिरू लागला आहे. दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ फिरत होता. आता सुप्रिया सुळे यांचा रथ फिरू लागला आहे.

बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा, नणंद भावजयचे प्रचार रथ अन्...
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 12:03 PM

योगेश बोरसे, बारामती, पुणे, दि. 18 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू वाहू लागले आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु केली आहे. काही ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. लोकसभा निवडणुका मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी सर्वात आधी पवार यांच्या बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा सुरु झाला. आता संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे. कारण बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत जवळपास निश्चित झाली आहे.

नणंद-भावजय यांचे लढत रंगणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरत आहे. या प्रचार रथाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती दिली जात आहे. त्यासाठी गाडीवर सुनेत्रा पवार यांचे फ्लॅक्स लावण्यात आले आहे.

आता सुप्रिया सुळे यांचा रथ तयार

सुनेत्रा पवारानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा विकास रथ तयार झाला आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि केलेली कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागला आहे. दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ फिरत आहे. आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विकास रथ फिरू लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जात आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू झाला आहे.

हे ही वाचा बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांचा उमेदवार ठरला ? प्रचाराचा रथ फिरणार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.