AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : अंगात धमक अन् रक्तात जिंकण्याचं वेड, बारामतीच्या पठ्ठ्यानं यशस्वीरित्या पूर्ण केली ब्रिटनमधली सायकल स्पर्धा!

या स्पर्धेत अनेक भारतीयांचा समावेश होता. परंतू सर्वात वयस्कर स्पर्धक असूनदेखील वेळेच्या 3 तास आधीच जाधव त्यांनी अनेक तरूण स्पर्धंकाच्या आधी ही स्पर्धा पूर्ण केली.

Pune : अंगात धमक अन् रक्तात जिंकण्याचं वेड, बारामतीच्या पठ्ठ्यानं यशस्वीरित्या पूर्ण केली ब्रिटनमधली सायकल स्पर्धा!
ब्रिटनमधील आयर्नमॅन स्पर्धा जिंकणारे स्पर्धक दशरथ जाधवImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 4:20 PM

बारामती : बारामतीच्या दशरथ जाधव यांनी 66व्या वर्षी जगातली सर्वात अवघड समजली जाणारी सायकल स्पर्धा (Cycling competition) पूर्ण केली आहे. 66व्या वर्षी स्पर्धा पूर्ण करणारे दशरथ जाधव हे भारतातील एकमेव सायकलपटू ठरले आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीचे सुपुत्र आणि पुण्याचे उद्योजक दशरथ दिनकर जाधव (Dashrath Jadhav) यांनी इंग्लंडच्या लंडन आणि स्कॉटलंडच्या एडिनबर्ग या दोन ‘कॅपिटल’ शहरांमध्ये होणारी जगातील सर्वात अवघड समजली जाणारी 1520 किमी (930 मैल) सायकल स्पर्धा वयाच्या 66व्या वर्षी 125 तास 33 मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून इतिहास (History) रचला आहे. लंडन एडिनबर्ग लंडन ही 1540 किलो मिटरची अत्यंत कठीण अशी सायकल स्पर्धा 1520 किमी सायकलिंग 128 तासांत पूर्ण करणे आवश्यक होते. जाधव यांनी ठरलेल्या वेळेआधीच स्पर्धा जिंकली.

शारीरिक तसेच मानसिक अशा दोन्हीचा समतोल साधला

यामध्ये एकूण 20 कंट्रोल पॉइंट्स होते आणि दोन कंट्रोल पॉइंट्समधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदती शिवाय तेही ठराविक वेळेतच पूर्ण करायचे असते. स्पर्धा चालू असताना नियमानुसार लहान चूक जरी झाली तरी स्पर्धकाला बाद ठरविले जाते. अशामध्ये स्पर्धकाला शारीरिक तसेच मानसिक अशा दोन्हीचा समतोल साधत जवळपास 47, 564 फूट चढ आणि 47,563 फूट उतार असलेल्या डोंगराळ रस्त्यावरून ऊन, वारा, पाऊस असतानाही अतिशय किचकट परिस्थितीत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते.

देशाची मान उंचावली

दशरथ दिनकर जाधव यांनी ही स्पर्धा 125 तासांतच पूर्ण करून भारतातील एकमेव स्पर्धक ज्यांनी ही स्पर्धा वयाच्या 66व्या वर्षी पूर्ण करत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. त्यांनी महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मान उंचावली आहे.

3 तास आधीच स्पर्धा केली पूर्ण

इतिहास घडवायला अंगात तेवढी धमक आणि रक्तात वेड लागते. या स्पर्धेत अनेक भारतीयांचा समावेश होता. परंतू सर्वात वयस्कर स्पर्धक असूनदेखील वेळेच्या 3 तास आधीच जाधव त्यांनी अनेक तरूण स्पर्धंकाच्या आधी ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये 120 भारतीय सायकलस्वारांनी भाग घेतला होता. त्यातील 47 भारतीय सायकल स्वरांनी स्पर्धा पूर्ण केली आहे.

सर्वात वयोवृद्ध भारतीय स्पर्धक

दशरथ जाधव यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करून किताब मिळाला होता. त्यानंतर त्यांनी सलग 7 वेळा आयर्न मॅन स्पर्धा जिंकून पूर्ण आयर्न मॅनचा किताब मिळवणारे जाधव हे सर्वात वयोवृद्ध भारतीय स्पर्धक आहेत.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.