Video : ‘बारीक व्हा.. बारीक व्हा…’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पोलीस उपायुक्तांना जाहीर व्यासपीठावर सल्ला!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक दुचाकीच्या वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर दुचाकीची प्रातिनिधीक चावी स्वीकारण्यासाठी आले, त्यावेळी त्यांच्याकडं पाहून अजित पवारांनी चावी देताना त्यांच्याकडे पाहून सर्वांसमोरच ‘जरा बारीक व्हा’ असा सल्ला दिला.
पिंपरी – आपल्या परखड , स्पष्ट बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)प्रसिद्ध आहेत. अजित दादांना एखादी गोष्टी खटकली तर पुढचा मागचा विचार न करता जागेवरच स्पष्ट बोलून टाकतात याचा प्रत्यय अनेकदा येतो. आजही असाच काहीसा प्रसंग घडला उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या(Pimpri Chinchwad) दौऱ्यावर असताना त्याच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिसांना पेट्रोलिंगचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे हे बाईकची किल्ली घेण्यासाठी गेले असता अजित पवारांनी हसत हसत तब्बेत कमी करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल झाला आहे. या दौऱ्यात अजित पवारांनी तळवडे – जॉगिंग ट्रॅक व नव्याने विकसित केलेल्या उद्यानाचे उद्घाटन केले. याबरोबरच पिंपरी महानगरपालिकेने उभारलेल्या हॉकी अकॅडमी उद्घाटन उघटनहीत्यांनी केले. यावेळी हॉक्की खेळण्याचा आनंदही त्यांनी लुटायला ,तसेच त्या ठिकाणीया असलेल्या खेळाडूशी चर्चाही केली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक दुचाकीच्या वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर दुचाकीची प्रातिनिधीक चावी स्वीकारण्यासाठी आले, त्यावेळी त्यांच्याकडं पाहून अजित पवारांनी चावी देताना त्यांच्याकडे पाहून सर्वांसमोरच ‘जरा बारीक व्हा’ असा सल्ला दिला. यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांचा स्पष्टवक्तेपणा पाहायला मिळाला. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पालिका अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी ही केली होती कान उघडणी
अजित पवार यांच्या शिस्त प्रियतेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्यामध्ये एक वचक आणि दडपण पाहायला मिळते. त्यामुळे बऱ्याचदा प्रशासनातील अधिकारी अजितच्या दौऱ्यात सावध असलेले पहायला मिळतात. यापूर्वीही पुणे पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीच्या उद्घटनाला अजित पवार यांना बोलावण्यात आले होते . त्यावेळी त्यांनी थेट बांधकामातील त्रुटी काढत पोलीस आयुक्तांनाच सुनावले होते. त्याच बरोबर मला उदघाटन समारंभाच्या कार्यक्रमाला बोलावताना आधी विचार करत जावा, असा खोचक सल्ला ही दिला होता.