पुणे-पिंपरीत विदारक चित्र, YCM मध्ये रुग्णांना झोपावयाला जमीनही पुरेना

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विदारक स्थिती आता समोर आली आहे. ही स्थिती बघून आपल्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल (Pimpri Chinchwad YCM municipal hospital).

पुणे-पिंपरीत विदारक चित्र, YCM मध्ये रुग्णांना झोपावयाला जमीनही पुरेना
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 6:55 PM

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हा आकडा थोपवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रशासन प्रचंड प्रयत्नही करतंय. मात्र, आता प्रशासनही हतबल होताना दिसतंय. दररोज शेकडो कोरोनाबाधित आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विदारक स्थिती आता समोर आली आहे. ही स्थिती बघून आपल्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल. महापालिकेच्या रुग्णालयात आता रुग्णांना चक्क जमीनीवर झोपवून ऑक्सिजन दिलं जातंय (Pimpri Chinchwad YCM municipal hospital).

महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स संपले

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नाव आहे. मात्र, ह्याच महापालिकेच्या रुग्णालयातील विदारक घटना समोर आली आहे. महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णाला जमिनीवर झोपून ऑक्सिजन दिले जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांची मोठी रांग लागलेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्यव्यवस्था एकदम कोलमडून गेली आहे. शहरातील महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स संपले आहेत.

बेड मिळवण्यासाठी पाच-सहा दिवसांची प्रतिक्षा

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना पाच ते सहा दिवस महापालिका रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. या रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना दुसरीकडे बेड्स शोधण्याचे सांगण्यात येत आहे. बेड उपलब्ध नसल्यामुळे महापालिका रुग्णालयात फरशीवर झोपूनच इतर कोरोनाबाधित रुग्णांवर ऑक्सिजन लाऊन उपचार केले जात आहेत. याशिवाय बेड्स उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

मनुष्यबळाची कमतरता

गेल्या 15 ते 16 वर्षांच्या सरावामध्ये प्रथमच रुग्णांना बेड्स नसल्याच्या कारणांमुळे जमिनीवर झोपून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे, अशी प्रतिक्रिया उपचार करणारे डॉक्टर देत आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरासह आसपासच्या जिल्ह्यांमधील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. शहरातील जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड सेंटर, नवीन भोसरी रुग्णालय हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शहरात विलगिकरन कक्ष वाढवावे लागतील. मात्र, हे सुरू करत असताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या किती?

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 67 हजार 776 लाखाजवळ जाऊन पोहचली आहे. तर 2177 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. मात्र ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन कुठं तरी कमी पडत असल्याने ही विदारक स्थिती नागरिकांवर ठेपली आहे (Pimpri Chinchwad YCM municipal hospital).

संबंधित बातमी : पुण्यातील विकेंड लॉकडाऊन संपला तरी निर्बंध कायम, काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.