पूजा खेडकर प्रकरण एका ट्विटमुळे उघडले, ते ट्विट करणारा वैभव आहे तरी कोण?

pooja khedkar upsc inquiry: बीड जिल्ह्यातील वैभव कोकाट रहिवासी आहे. त्याला सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड आहे. एक्सवर त्याचे ३१ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. वैभव याने त्या प्रकारावर पुन्हा एका टि्वट केले आहे.

पूजा खेडकर प्रकरण एका ट्विटमुळे उघडले, ते ट्विट करणारा वैभव आहे तरी कोण?
वैभव कोकाट, पूजा खेडकर
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 2:38 PM

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात पोहचले आहे. या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) हादरले आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. आता पूजा खेडकर हिची नोकरीच धोक्यात आली आहे. यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला आयएएस रद्द का करु नये? अशी नोटीस बजावली आहे. देशात खळबळ निर्माण करणारे हे प्रकरण आले तरी कसे? एका तरुणाने केलेल्या ट्विटमुळे हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाचे नाव आहे वैभव कोकाट. सोशल मीडियाची ही ताकद लक्षात आल्यावर वैभव म्हणतो, एका ट्वीटमुळे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.

पूजा खेडकर कोण? माहीतच नव्हते

निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या पूजा खेडकर कोण आहे? हे काही दिवसांपूर्वी कोणालाच माहीत नव्हते. त्यासंदर्भात वैभव कोकाट म्हणतो, “पूजा खेडकरसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला. तो मला मिळाला. तो वाचल्यावर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माज कसा करु शकतो? असा प्रश्न मला पडला. त्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय मी घेतला.”

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकर हिचा शोध घेताना तिने बेकायदा अंबर दिवा ऑडी कारवर लावल्याचे लक्षात आले. त्याचे फोटो मला मिळाले. ते पोलिसांपुढे दिले असते तर प्रशासकीय दिरंगाई झाली असती, हे मला माहीत होते. त्यामुळे थेट सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे वैभव कोकाट यांने म्हटले.

वैभव कोकाट याने ६ जुलै रोजी केलेले टि्वट

अनेकांनी सोशल मीडियावरील लेखन थांबवले

वैभव याने ६ जुलै रोजी पूजा खेडकर यांच्याबाबतची माहिती फोटोसह ‘एक्स’वर टाकली. त्यानंतर काही वेळेत ती प्रचंड व्हायरल झाली. प्रसारमाध्यमांनी त्या पोस्टची दखल घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते यांचे वैभवला फोन आले. मग पूजा खेडकर संदर्भात अनेक माहिती आपल्याकडे येऊ लागल्याचे वैभवने सांगितले. या प्रकरणानंतर अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले. सोशल मीडियावरील लेखन थांबवले.

कोण आहे वैभव कोकाट

बीड जिल्ह्यातील वैभव कोकाट रहिवासी आहे. त्याला सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड आहे. त्याने एका जनसंपर्क कंपनीत काम केले आहे. एक्सवर त्याचे ३१ हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. वैभव याने त्या प्रकारावर पुन्हा एका टि्वट केले आहे. त्यात तो म्हणतो, एका ट्विट मध्ये मोठी ताकद असते, आपण निर्भिडपणे लिहिले पाहिजे. काळ कठीण असला तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरे बोलले पाहिजे. व्यवस्थेविरोधात लिहा, बोला. व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात आहे…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.